केवळ १५७ रूपयांत SBI उचलणार कोरोनाच्या उपचारांचा खर्च; पाहा कोणती आहे ही पॉलिसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 13:31 IST2021-04-14T13:26:50+5:302021-04-14T13:31:25+5:30
सध्या देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे आणि कोरोनावरील उपचारांसाठीही मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची बाधा होत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अनेकदा रुग्णालयात असताना कोरोनावरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात येत असतो आणि ते रुग्णालयाचा खर्च भरताना अनेकांची दमछाक होते.
सध्या देशातील प्रमुख शहरांमध्येही स्थिती भयावह होत चालली आहे. तर दुसरीकडेही सरकारनं कंबर कसली असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे.
जर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आणि त्याच्या उपचारांवरील खर्चाबाबत जर तुम्ही चिंतीत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियानं एक पॉलिसी आणली आहे.
स्टेट बँकेनं ग्राहकांसाठी कोरोना रक्षक नावाची नवी पॉलिसी बाजारात आणली आहे.
या अंतर्गत ग्राहकांना केवळ १५७ रूपयांत ५० हजार रूपयांपर्यंतचं कव्हर मिळतं.
स्टेट बँक ऑफ इंडियानं सादर केलेला हा एक इन्शुरन्स प्रोटेक्शन प्लॅन आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० टक्के कव्हर देण्यात येतं.
ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचं वय किमान १८ वर्षे असणं आवश्यक आहे.
या पॉलिसीचा मिनिमम प्रिमिअम प्लॅन १५६.५० रूपये इतका आहे. तर कमाल प्रिमिअम प्लॅन २२३० रूपये आहे.
ही टर्म पॉलिसी १०५ दिवस, १९५ दिवस आणि २८५ दिवसांची आहे.
कोरोना रक्षक पॉलिसीवर ग्राहकांना किमान ५० हजार रूपये आणि कमाल २ लाख ५० हजार रूपयांपर्यंत कव्हर मिळतं.
या अंतर्गत जर १०५ दिवसांचा प्लॅन घ्यायचा असेल तर १५७ रूपयांचा प्रिमिअम द्यावा लागेल. या अंतर्गत ५० हजार रूपयांपर्यंतचं कव्हर मिळतं.
तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रान्चमध्ये जाऊन किंवा संकेतस्थळावर जाऊन याबबातची माहिती घेऊ शकता.