५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती

By जयदीप दाभोळकर | Updated: October 15, 2025 09:26 IST2025-10-15T09:20:30+5:302025-10-15T09:26:13+5:30

Post Office Investment Scheme: आजकाल गुंतवणूक ही महत्त्वाची झाली आहे. भविष्यातील गरजा भागवण्यासाठी तसंच आपात्कालिन परिस्थितीत गुंतवणूक कामाला येते.

Post Office Investment Scheme: आजकाल गुंतवणूक ही महत्त्वाची झाली आहे. भविष्यातील गरजा भागवण्यासाठी तसंच आपात्कालिन परिस्थितीत गुंतवणूक कामाला येते. त्यामुळे गुंतवणूक ही आवश्यकच आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. त्यामुळे अनेक जण गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतींनाही प्राधान्य देतात.

बँकाच नाही, तर पोस्ट ऑफिसच्या (Post Office) काही योजनाही इतक्या फायदेशीर असतात की, त्यात गुंतवणूक करून तुम्ही लखपती होऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला पाच वर्षांतच लखपती बनवू शकते. पोस्ट ऑफिसच्या या योजना सरकारची हमीसह येतात आणि त्यात नुकसान होण्याची भीती नसते. चला, पोस्ट ऑफिसच्या या योजनेबद्दल जाणून घेऊया।

जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट (RD) योजनेत २५,००० रुपये गुंतवले, तर ५ वर्षांनंतर तुम्हाला १७ लाखाहून अधिक रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला ६.५ टक्के वार्षिक आणि मासिक चक्रवाढ व्याज दिलं जातं. म्हणजेच, तुमच्या एकूण जमा रकमेवर २.७४ लाखांचे व्याज मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला ५ वर्षांनंतर १७,७४,७७१ रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिसमध्ये RD कोणताही भारतीय उघडू शकतो. याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, हे खातं दोन-तीन जण एकत्र मिळूनही उघडू शकतात. पोस्ट ऑफिसच्या RD मध्ये किमान १०० रुपये आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवता येते. पोस्ट ऑफिसची आरडी तुम्ही गरज पडल्यास बंद देखील करू शकता, परंतु यासाठी काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करून आरडी बंद केली जाते.

जर RD पूर्ण होण्यापूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाला, तर RD चे पैसे त्याच्या कायदेशीर वारसदाराला मिळतात. यासाठी वारसदाराला पोस्ट ऑफिसमध्ये काही कागदपत्रे जमा करावी लागतात, त्यानंतर त्याला पैसे मिळतात. तथापि, जर वारसदाराला ती आरडी पुढे चालू ठेवायची असेल, तर त्याला त्याचीही परवानगी असते.

व्याज दर सरकार निश्चित करते आणि ते त्रैमासिक कंपाऊंड होते, ज्यामुळे परतावा चांगला मिळतो. दर महिन्याला निश्चित तारखेपूर्वी रक्कम जमा करावी लागते, अन्यथा प्रति ₹१०० वर १ रुपया दंड लागतो. याव्यतिरिक्त, खातं उघडताना नॉमिनेशन नक्की करा जेणेकरून भविष्यात कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही.