Reliance Jio : केवळ २ रूपये अधिक, डेटासोबत मिळतेय दुप्पट वैधता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 08:33 PM2021-06-17T20:33:16+5:302021-06-17T20:36:54+5:30

Reliance Jio Plans : रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियासारख्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना देत आहेत भन्नाट ऑफर्स.

रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) सारख्या कंपन्या ग्राहकांना अनेक आकर्षक प्लॅन्स ऑफर करत आहेत. रिलायन्स जिओकडे ९८ रूपयांपासून ते २५९९ रूपयांपर्यंतचे प्लॅन आहेत.

या प्लॅन्समध्ये ग्राहकांना १४ दिवसांपासून ते थेट एका वर्षापर्यंतची वैधता मिळतेय या प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा तर मिळतोच. परंतु या सोबत अन्य बेनिफिट्सही मिळतात.

आज आपण दोन रिलायन्स जिओचे प्लॅन पाहणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे नो डेटी डेटा लिमिट असलेला प्लॅन आहे. ज्याची किंमत १२७ रूपये इतकी आहे. तर दुसरा प्लॅन १२९ रूपयांचा आहे.

जर तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता नसेल तर तुम्ही केवळ २ रूपये अधिक देऊन दुप्पट वैधता असलेला १२९ रूपयांचा प्लॅन विकत घेऊ शकता.

रिलायन्स जिओचा १२७ रूपयांचा प्लॅन No Daily Data Limit असलेल्या प्लॅनचा एक भाग आहे. या प्लॅनमध्ये युझर्सना १५ दिवसांची वैधता मिळते. तसंच ग्राहकांना यासोबत १२ जीबी डेटा देण्यात येतो.

या प्लॅनमध्ये दररोज डेटा वापरण्यासाठी मर्यादा नसल्यानं तुम्ही एका दिवसात हवा तितका डेटा खर्च करू शकता.

या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आ्रणि दररोज १०० एसएमएससह जिओ अॅप्सचंही सबस्क्रिप्शन मिळतं.

रिलायन्स जिओचा १२९ रूपयांचा प्लॅनही स्वस्त आणि मस्त प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते.

याचाच अर्थ तुम्ही १२७ रूपयांच्या प्लॅनच्या तुलनेत २ रुपये अधिक म्हणजे १२९ रूपये देऊन रिचार्ज केल्यास तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळेल. परंतु या प्लॅनमध्ये एकूण केवळ २ जीबीच डेटा मिळतो.

या प्लॅनसह ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३०० एसएमएस आमि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!