जबरदस्त! TATA च्या 'या' शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल, एका महिन्यात ६९२ कोटींची केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 05:11 PM2023-04-08T17:11:55+5:302023-04-08T17:25:33+5:30

टाटा समुहाच्या या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

दिवंगत गुंतवणूकदार दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक स्टॉक्स आहेत जे उत्तम परतावा देत आहेत. असाच एक स्टॉक टाटा समूहाच्या टायटनचा आहे.

असाच एक स्टॉक TATA समूहाच्या टायटनचा आहे. या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत एका महिन्यात जबरदस्त झेप घेतली आहे.

रेखा झुनझुनवाला यांच्याकडे LIC समर्थित टायटनमध्ये ५.१७ टक्के हिस्सा किंवा ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत.

टायटनच्या शेअरची किंमत एका महिन्यात प्रति शेअर २३९७.१० वरून २५४८ प्रति शेअर झाली आहे. यावेळी किंमत प्रति शेअर १५०.९० ने वाढली आहे.

डिसेंबर २०२२ च्या तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहता रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे ४,५८,९५,९७० शेअर्स आहेत. टायटनच्या शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीत गेल्या एका महिन्यात अंदाजे ६,९२,५७,०१,८७३ अंदाजे ६९२ कोटींची वाढ झाली आहे.

डिसेंबर तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार LIC ने टायटनमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC कडे टायटन कंपनीचे २,०५,१९,६९९ शेअर्स आहेत.

टाटा समूहाच्या कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या २.३१ टक्के आहे. एलआयसीकडे सप्टेंबर तिमाहीत टायटनचे २,८९,६३,५९६ शेअर्स होते, जे कंपनीच्या एकूण पेड-अप भांडवलाच्या ३.२६ टक्के होते. एलआयसीने तिसर्‍या तिमाहीत टाटा समूहाच्या कंपनीतील आपली हिस्सेदारी कमी केली आहे.

SBI निफ्टी 50 ETF ने देखील Titan मध्ये गुंतवणूक केली आहे. डिसेंबर तिमाहीपर्यंत, SBI निफ्टी 50 ETF कडे टायटनचे १,४०,०५,६९३ शेअर्स होते.

म्हणजेच कंपनीतील १.५८ टक्के हिस्सा होता. जानेवारी ते मार्च २०२३ तिमाहीचे आकडे अजून आलेले नाहीत.