शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ratan Tata: जर आपल्याकडे असतील रतन टाटा यांच्या या 4 कंपन्यांचे शेअर्स तर व्हाल मालामाल, जाणूनघ्या डिटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 1:17 PM

1 / 11
शेअर बाजारातील योग्य कंपन्यांचे शेअर्स खरेदी केल्यास निश्चितपणे बम्पर परतावा मिळू शकतो. रतन टाटा (Ratan Tata) यांच्या टाटा समूहातील (Tata Group) अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे यातील अनेक कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश अर्थात डिव्हिडंड देखील देतात.
2 / 11
टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांनी नुकतेच आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडंड (Dividend) देण्याची घोषणा केली आहे. यांपैकी 4 कंपन्या पुढील आठवड्यात एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करणार आहेत. हा डिव्हिडंडसाठी निश्चित रेकॉर्ड डेटच्या एक दिवस आधीचा दिवस असतो. रेकॉर्ड डेट म्हणजे अशी तारीख जी शेअरधारक निर्धारित करण्यासाठी निश्चित केली जाते.
3 / 11
नेल्को, व्होल्टास, इंडियन हॉटेल्स आणि टाटा पॉवर, अशी या 4 कंपन्यांची नावे आहेत. जर आपल्या पोर्टफोलियोमध्ये या चार कंपन्यांची नावे असतील तर आपल्याला बम्पर नफा मिळणे निश्चित आहे. जाणून घेऊयात टाटा ग्रुपच्या या कंपन्यांच्या डिव्हिडंडसंदर्भात.
4 / 11
टाटा पॉवर - टाटा पॉवरच्या गुंतवणूकदार मंडळाने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी शेअरधारकांना 1 रुपया प्रति इक्विटी शेअरवर 2 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. या एक्स-डिव्हिडंड तारीख 7 जून ही आहे.
5 / 11
महत्वाचे म्हणजे, या कंपनीला यावेळी चांगला नफा मिळाला आहे. टाटा पॉवरचा प्रॉफिट 31 मार्च 2022 च्या तिमाहीत 48 टक्क्यांनी वाढून 939 कोटी रुपये झाला आहे. टाटा पॉवरचा शेअर गुरुवारी वाढीसह बंद झाला होता. यात चांगली तेजी दिसून आली होती.
6 / 11
व्होल्टास - टाटा समूहाची कंपनी व्होल्टादेखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश अथवा डिव्हिडंड देत आहे. व्होल्टासच्या गुंतवणूकदार मंडळाने 2022-23 साठी 425 टक्के अथवा 4.25 रुपये प्रति शेअर च्या डिव्हिडंडची शिफारस केली आहे. हा स्टॉक 9 जून 2023 रोजी एक्स-डिव्हिडंडवर ट्रेड करेल.
7 / 11
मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 21.6 टक्क्यांनी घसरून 143.23 कोटी रुपयांवर आला आहे. गुरुवारी व्होल्टासचा शेअर 5 अंकांनी वाढून 826.80 रुपयांवर बंद झाला.
8 / 11
या कंपन्याही देणार डिव्हिडंड - टाटा समूहाची कंपनी असलेल्या नेल्कोच्या गुंतवणूकदार मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना 20 टक्के अथवा 2 रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 22 जून 2023 रोजी होणार आहे. याची रेकॉर्ड डेट 6 जून निश्चित करण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 82.8 कोटी एवढा आहे.
9 / 11
यासोबतच इंडियन हॉटेल्स कंपनीनेही गुंतवणूकदारांना डिव्हिडंड अथवा लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या गुंतवणूकदार मंडळाने FY23 साठी 1 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड घोषित केला आहे.
10 / 11
या शेअरने 9 जून 2023 साठी महसुलात 3056.22 कोटी रुपयांवरून 5809.9 कोटी रुपयांपर्यंत 65 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. इंडियन हॉटेल्स कंपनीचा शेअर गुरुवारी 1.36 टक्क्यांच्या वाढीसह 395 रुपयांवर बंद झाला आहे.
11 / 11
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :TataटाटाRatan Tataरतन टाटाshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार