By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:49 IST
1 / 7टाटा समूहातील दिग्गज कंपनी 'टायटन'ने आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा देत मालामाल केले आहे. बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटच्या जोरावर या शेअरने गेल्या १५ वर्षांत १ लाखाचे ४ कोटी रुपये केले आहेत. 2 / 7महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारचे 'बिग बुल' मानल्या जाणाऱ्या दिवंगत राकेश झुनझुनवाला यांचा हा आवडता शेअर होता. आजही त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची यात मोठी भागीदारी आहे.3 / 7२५ मार्च २०११ रोजी टायटनच्या एका शेअरची किंमत १७५.४५ रुपये होती. जर तेव्हा एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला ५६८ शेअर्स मिळाले असते. जून २०११ मध्ये कंपनीने एक बोनस शेअरही दिला आहे. 4 / 7याव्यतिरिक्त, त्याचे शेअर्स १० भागांमध्ये विभागले गेले आहेत. टायटनने जारी केलेले बोनस शेअर्स आणि शेअर स्प्लिट जोडल्यास, एकूण शेअर्सची संख्या ११,३६० होते. २५ मार्च २०२६ रोजी बीएसईवर टायटनचा शेअर ₹४०३८.४० वर बंद झाला. यानुसार, ११,३६० शेअर्सचे सध्याचे मूल्य ₹४.५८ कोटी आहे. यात कंपनीने दिलेला लाभांश समाविष्ट नाही.5 / 7झुनझुनवाला यांचा फेव्हरिट स्टॉक...! - टायटनमध्ये राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक होती. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे तब्बल ४७१८४४७० शेअर्स आहेत. अर्थात रेखा झुनझुनवाला यांची कंपनीत ५.३१% हिस्सेदारी आहे.6 / 7गेल्या पाच वर्षांत हा शेअर १६८ टक्क्यांची वधारला आहे. एका वर्षात ३२ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)