Rakesh Jhunjhunwala ना मुहुर्तालाच १०१ कोटींचा फायदा; TATA सह ‘या’ ५ स्टॉक्समुळे मोठा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:54 IST2021-11-05T17:48:43+5:302021-11-05T17:54:17+5:30
Rakesh Jhunjhunwala यांच्यासह डॉली खन्ना, आशीष कचोलिया, मुकुल अग्रवाल या बड्या गुंतवणूकदारांनी मुहुर्ताला जबरदस्त खरेदी केली आहे.

दिवाळीत शेअर बाजारात मुहूर्त ट्रेंडिंग केले जाते. यामध्ये शगुन म्हणून शेअर खरेदी तसेच गुंतवणूक करण्याची मोठी परंपरा असल्याचे पाहायला मिळते. लक्ष्मी पूजनावेळी शेअर मार्केटमध्ये सकारात्मकता दिसून आली.
या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात केल्याने गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुंबई शेअर बाजारात अभिनेत्री भाग्यश्री प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. भाग्यश्री हिच्या हस्ते घंटानाद करुन ट्रेंडिग सुरु करण्यात आले.
यातच शेअर मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना शेअर मार्केटचा ट्रेंडिंग मुहूर्त मोठ्या प्रमाणावर लाभल्याचे सांगितले जात आहे. कारण मुहूर्तालाच राकेश झुनझुनवाला यांना तब्बल १०१ कोटींचा फायदा झाला आहे.
Rakesh Jhunjhunwala यांना टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, क्रिसिल, एस्कॉर्ट्स आणि डेल्टा ग्रुप या कंपनीच्या स्टॉक्सचा भरपूर लाभ मुहुर्ताला झाला, असे सांगितले जात आहे.
Rakesh Jhunjhunwala यांच्यासह डॉली खन्ना, आशीष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल या बड्या गुंतवणूकदारांनी मुहुर्ताला जबरदस्त खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
Rakesh Jhunjhunwala यांना TATA मोटर्समुळे मोठा फायदा झाला. राकेश झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समधील होल्डिंग १७८३ कोटींवरून १८०० कोटी रुपयांवर पोहोचली. टाटा मोटर्समुळे राकेश झुनझुनवाला यांना १७.८२ कोटी रुपयांचा फायदा झाला. टाटा मोटर्सचे शेअर्स १६२ टक्क्यांनी वाढले आहेत.
TATA मोटर्ससह इंडियन हॉटेल्स आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा Rakesh Jhunjhunwala यांना चांगला फायदा झाला. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे ३१.१३ कोटींची कमाई मुहुर्तावरच राकेश झुनझुनवाला यांनी केली. या क्षेत्रातील होल्डिंग वाढून ५३८.८४ कोटी झाली आहे.
यासह Rakesh Jhunjhunwala यांना क्रिसिलच्या शेअर्समुळेही मोठा फायदा झाला आहे. या शेअर्समध्ये २ टक्के वाढ नोंदवण्यात आली. यामुळे राकेश झुनझुनवाला यांची होल्डिंग २१.७२ कोटी रुपयांनी वाढून ११४४ कोटी रुपयांवर केली आहे.
राकेश झुनझुनवाला यांना एस्कॉर्ट्स कंपनीच्या शेअर्समुळे मोठा लाभ झाला आहे. या कंपनीतील Rakesh Jhunjhunwala यांची होल्डिंग १८.११ कोटी रुपयांनी वाढून ९७८ कोटी झाली आहे. एस्कॉर्ट्स डेल्टा ग्रुपच्या स्टॉक्समुळेही राकेश झुनझुनवाला यांची दिवाळी जबरदस्त हीट झाली. या कंपनीच्या शेअर्समधील होल्डिंग १२.६ कोटी रुपयांनी वाढून ५६३.४० कोटी रुपये झाली आहे.
दुसरीकडे Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर मार्केटमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत टाटा समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे.
Rakesh Jhunjhunwala यांच्या यासाठी टायटनचा हा शेअर्स चांगले रिटर्न देणारा ठरला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मिळून कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. सध्या दोघांकडेही मिळून कंपनीचा ४.८७ टक्के हिस्सा आहे.
आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Man Infraconstruction चे ३० लाख शेअर्स, Anant Raj कंपनीचे सुमारे १ कोटींचे स्टॉक, Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स आणि Delta Corp कंपनीचे ८५,००,००० शेअर्स आहेत.