Rakesh Jhunjhunwala ची २ महिन्यांत १२६ कोटींची कमाई; TATA सह ‘या’ ३ कंपन्यांमुळे मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 01:49 PM2021-11-25T13:49:38+5:302021-11-25T13:55:23+5:30

Rakesh Jhunjhunwala यांना गेल्या दोन महिन्यांत TATA ग्रुपसह दोन सरकारी कंपन्यांमुळे मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स...

आताच्या घडीला शेअर मार्केट सार्वकालिक उच्चांकावर आहे. अनेकविध कंपन्यांचे IPO सादर केले जात आहे. गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची मोठी सुवर्ण संधी उपलब्ध होत आहे. तसेच अनेक कंपन्या उत्तम रिटर्न्स देत असल्यामुळे गुंतवणूकदार मालामाल होताना पाहायला मिळत आहेत.

अशातच शेअर मार्केटमध्ये बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांना गेल्या तिमाहीत शेअर मार्केटमधील काही शेअर्समुळे मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

केवळ मागील दोन महिन्यात Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर मार्केटच्या माध्यमातून तब्बल १२६ कोटींची कमाई केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपसह अन्य काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील गुंतवणुकीने राकेश झुनझुनवाला यांना भरघोस रिटर्न्स दिल्याचे पाहायला मिळत आहे.

याशिवाय TATA ग्रुपच्या इंडियन हॉटेल्स कंपनी या कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाढवली असून, या टाटाचा हा शेअर Rakesh Jhunjhunwala यांना ४० टक्के रिटर्न्स देऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

गेल्या तिमाहीचा म्हणजेच जुलै ते सप्टेंबर २०२१ या कालावधीचा विचार केल्यास Rakesh Jhunjhunwala यांची मिळकत १२६ कोटी रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये दोन सरकारी कंपन्यांचा समावेश आहे, ज्या कंपन्यांमुळे राकेश झुनझुनवाला यांना मोठाच फायदा झाला आहे.

बिल बुल Rakesh Jhunjhunwala यांनी आपल्या पोर्टफोलियोमध्ये कॅनरा बँक, नाल्को आणि इंडिया बुल्स रियल इस्टेट यांच्या शेअर्सचा समावेश केला होता. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून येत असून, यामुळे राकेश झुनझुनवाला यांच्या कमाई चांगलीच वाढली आहे.

Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे नाल्कोचे २.५ कोटी इक्विटी शेअर्स असून, हे कंपनीत १.३६ टक्के हिस्सा असण्यासारखे आहे. कंपनीने सादर केलेल्या तिमाहीच्या आकड्यांमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे नाव दिसून आले. नाल्कोमध्ये LIC चा १.१ टक्के हिस्सा आहे. राकेश झुनझुनवाला यांना नाल्कोच्या शेअरमुळे ६.७५ कोटींचा फायदा झाला आहे.

याशिवाय Rakesh Jhunjhunwala यांनी कॅनरा बँकेचे २,८८,५०,००० इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. यामध्ये राकेश झुनझुनवाला यांची १.६ टक्के हिस्सेदारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कॅनरा बँकेचा शेअर तेजीत असून, यामुळे राकेश झुनझुनवाला यांना तब्बल ११३ कोटींचा फायदा झाला आहे.

Rakesh Jhunjhunwala यांना इंडिया बुल्स रियल इस्टेट कंपनीच्या शेअर्समुळेही मोठा फायदा झाला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीचे ५० लाख शेअर्स आहेत. यानुसार, राकेश झुनझुनवालांकडे याची १.१० टक्के हिस्सेदारी आहे. या कंपनीच्या शेअर बाजारातील तेजीमुळे राकेश झुनझुनवाला यांना ६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

दुसरीकडे, Rakesh Jhunjhunwala यांचा स्टेक असलेली कंपनी सध्या IPO मुळे चर्चेत आहे. या कंपनीचं नाव Star Health and Allied Insurance Company आहे. ७२४९ कोटींचा आयपीओ आणणाऱ्या या कंपनीच्या आयपीओसाठी प्राईज बँडही निश्चित करण्यात आला आहे.

दरम्यान, Rakesh Jhunjhunwala यांनी नुकतीच नाल्को आणि स्टील निर्माता कंपनी सेलमध्ये आपली भागीदारी वाढवली आहे. NALCO ने एका वर्षात १७५ टक्के रिटर्न दिले. तर SAILने गेल्या एका वर्षात १८५ टक्के रिटर्न दिले आहेत. राकेश झुनझुनवाला यांनी नाल्कोमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

Rakesh Jhunjhunwala यांनी सप्टेंबर महिन्यात SAIL मध्ये आपली भागीदारी १.७६ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. तर एप्रिल-जून तिमाहीत या शेअर्समध्ये त्यांचा वाटा १.३९ टक्के एवढा होता.

Rakesh Jhunjhunwala यांना TATA मोटर्समुळे मोठा फायदा झाला. राकेश झुनझुनवाला यांची टाटा मोटर्समधील होल्डिंग १७८३ कोटींवरून १८०० कोटी रुपयांवर पोहोचली. राकेश झुनझुनवाला यांनी शेअर मार्केटमध्ये २४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.

Rakesh Jhunjhunwala सप्टेंबर तिमाहीत TATA समूहाच्या एका कंपनीत गुंतवणूक वाढवली असून, राकेश झुनझुनवाला यांची टाटा समूहाच्या तीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी टायटनचा शेअर्स चांगले रिटर्न देणारा ठरला आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मिळून कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे.

आताच्या घडीला Rakesh Jhunjhunwala यांच्याकडे Man Infraconstruction चे ३० लाख शेअर्स, Anant Raj कंपनीचे सुमारे १ कोटींचे स्टॉक, Tata Motors कंपनीचे ३,७७,५०,००० शेअर्स, Titan Stocks कंपनीचे ९६,४०,५७५ लाख शेअर्स आणि Delta Corp कंपनीचे ८५,००,००० शेअर्स आहेत.