शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Rakesh Jhunjhunwala ना धक्का! स्टार हेल्थच्या IPO ला थंड प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 6:06 PM

1 / 9
गेल्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. हजारो अंकांनी कोसळलेला बाजार आता काही प्रमाणात सावरताना दिसत आहे. यातच अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO येऊन बाजारात धडकत आहेत. या डिसेंबर महिन्यात १० कंपन्या आपले IPO सादर करणार असून, त्यातून १० हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस असल्याचे बोलले जात आहे.
2 / 9
अशातच बिग बुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनीच्या IPO ला अतिशय थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. किरकोळ गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
3 / 9
पहिल्या दिवशी स्टार IPO ला गुंतवणूकदारांचा संथ प्रतिसाद मिळाला. भारतीय भांडवली बाजारातील तमाम गुंतवणूकदारांचे Rakesh Jhunjhunwala शेअरच्या व्यवहाराबाबत गुरू मानले जातात. मात्र, आताच्या घडीला शेअर बाजारातील चढ-उतारांमुळे राकेश झुनझुनवाला यांना मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याची चर्चा आहे.
4 / 9
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स या खासगी आरोग्यविमा क्षेत्रातील कंपनीने IPO च्या माध्यमातून स्टॅक मार्केटमध्ये शिरकाव करण्याचा प्रवास सुरू केला. चालू वर्षातील तिसरा मोठा आयपीओ ठरणाऱ्या स्टार हेल्थसाठी गुंतवणूकदार सावध असल्याचे दिसून येते.
5 / 9
पेटीएमने तोंड पोळलेल्या गुंतवणूकदारांनी Rakesh Jhunjhunwala यांचे पाठबळ असूनही स्टार हेल्थकरिता पाठ फिरवल्याने एकूणच बाजारात चिंतेचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
6 / 9
या IPO द्वारे कंपनीची ७ हजार २४९ कोटी रूपये जमवण्याची इच्छा आहे. या IPO चा प्राईस बँड ८७० ते ९०० रूपयांदरम्यान ठरवण्यात आला होता. कंपनी फ्रेश इश्यूने जमवलेल्या रकमेचा वापर कंपनीचा कॅपिटल बेस वाढवण्यासाठी करणार आहे.
7 / 9
कंपनीने आपल्या बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले होते की, अँकर गुंतवणूकदारांना ९०० रुपये प्रति शेअर या किमतीने ३,५७,४५,९०१ इक्विटी शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
8 / 9
या IPO अंतर्गत कंपनीने २ हजार कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले असून, ५२४९ कोटी रूपयांचे इक्विटीची ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विक्री केली जाणार आहे.
9 / 9
स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या IPO च्या एका लॉटमध्ये एकूण १६ शेअर्स आहेत. या प्रकारे एका गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी १४४०० रूपये गुंतवावे लागतील. स्टार हेल्थ इन्शुरन्सरच्या शेअर्सचं लिस्टिंग १० नोव्हेंबर रोजी लिस्ट होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Rakesh Jhunjhunwalaराकेश झुनझुनवालाIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार