शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

35 रुपयांपर्यंत वाढणार रेल्वे तिकीट! सरकार लवकरच करणार शिक्कामोर्तब

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 29, 2020 4:21 PM

1 / 9
आगामी काही दिवसांत रेल्वे तिकीट 35 रुपयांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. या वाढीवर सरकार लवकरच शिक्कामोर्तब करेल, असा दावा पीटीआय या वृत्त संस्थेने केला आहे.
2 / 9
वृत्त संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेस्थानकांच्या नूतनीकरणासाठी रेल्वे प्रवाशांना 10 रुपये ते 35 रुपयांपर्यंत अतिरिक्त भाडे द्यावे लागू शकते.
3 / 9
यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे अंतिम रूप देत आहे. हा प्रस्ताव लवकरच कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवला जाईल.
4 / 9
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भाडेवाढ युझर चार्जमुळे होत आहे.
5 / 9
ज्या रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण करण्यात येत आहे आणि जेथे प्रवाशांची वर्दळ अधिक आहे, केवळ अशाच स्थानकांसाठी युझर चार्ज घेण्यात येईल, असे रेल्वेने पूर्वीच स्पष्ट केले होते.
6 / 9
रेल्वेने काही दिवसांपूर्वी सांगितले होते, की देशभरातील एकूण सात हजार रेल्वेस्थानकांपैकी किमान 700 ते 1000 रेल्वेस्थानके या श्रेणीत येतात.
7 / 9
सुविधांच्या मोबदल्यात युझर चार्ज घेतला जात असतो. सध्या असे शुल्क, विमानतळांवर घेतले जाते.
8 / 9
विमानतळांवर आकारला जाणारा युझर चार्ज हा तिकिटातच जोडला जातो. सांगण्याचा उद्देश हा, की विमान प्रवासाच्या तिकिटासाठी तुम्ही जे पैसे मोजता, त्यातच युझर चार्जदेखील असतो.
9 / 9
भारतीय रेल्वे...
टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीpassengerप्रवासीIndian Railwayभारतीय रेल्वे