भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 11:14 IST2025-04-25T11:11:12+5:302025-04-25T11:14:36+5:30

Indian Railways News : भारतीय रेल्वे सतत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. वंदे भारत असो, अमृत भारत असो वा नमो भारत असो. आता भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन आणि अमेरिकेलाही मागे टाकलं आहे.

मोदी सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिल्यानंतर अनेक क्षेत्रात स्वदेशी वस्तूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. रेल्वे विभागही यात मागे राहिला नाही. भारतीय रेल्वे वंदे भारत, अमृत भारत आणि नमो भारत सारख्या नवीन गाड्या चालवून प्रवाशांचा प्रवास सोपा करत आहे. एवढेच नाही तर या गाड्या परदेशात धावणाऱ्या गाड्यांपेक्षा खूपच चांगल्या आणि आरामदायी आहेत.

याशिवाय, रेल्वेशी संबंधित आणखी एका बाबतीत भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. चीन, ब्रिटन आणि अमेरिके सारख्या सधन देशांना रेल्वेने मागे टाकलं आहे. हे जाणून घेतल्यावर तुम्हीही भारतीय रेल्वेला सलाम कराल.

भारतीय रेल्वे हळूहळू शून्य कार्बनकडे वाटचाल करत आहे. भारतीय रेल्वेचे संपूर्ण नेटवर्कवर लवकरच विद्युतीकरण होणार आहे. रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा पर्यावरणासाठी होईल.

रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आतापर्यंत ९८ टक्के म्हणजेच ६८ हजार किलोमीटर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. म्हणजेच येथे इलेक्ट्रिक इंजिन चालतात. या उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होते.

आता फक्त २ टक्के रेल्वे मार्ग शिल्लक आहेत, जिथे विद्युतीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. रेल्वे मंत्रालयाच्या मते, उर्वरित रेल्वे मार्गांचे लवकरच विद्युतीकरण केले जाईल. त्यानंतर भारत हा पहिला देश बनेल जिथे रेल्वे मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण होईल.

काही राज्यांमध्ये १००% विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांचा समावेश आहे. याशिवाय उर्वरित राज्यांमध्ये विद्युतीकरणाचे काम लवकरच पूर्ण केले जाईल.

इतर देशांचा उल्लेख केला तर फ्रान्समध्ये ५८%, रशियामध्ये ७०%, मलेशियामध्ये ८०%, स्पेनमध्ये ६८%, स्पेनमध्ये ६८%, चीनमध्ये ५०%, जर्मनीमध्ये ६२%, युक्रेनमध्ये ४७%, तुर्कीमध्ये ४०%, इटलीमध्ये ४९ टक्के, दक्षिण आफ्रिकेत ३५ टक्के, ब्राझीलमध्ये ३० टक्के, ऑस्ट्रेलियात १० टक्के आणि अमेरिकेत सुमारे १ टक्के विद्युतीकरणाचे काम झाले आहे.