परदेशात धोकादायक म्हणून 'बॅन' आहेत 'या' 10 वस्तू, पण भारतात होते धाडाक्यात विक्री...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 03:41 PM2021-07-14T15:41:02+5:302021-07-14T16:04:23+5:30

जगातील अनेक देशांत बंदी असलेले प्रोडक्ट्स भारतात मात्र, धडाक्यात विकले जात आहेत. यातील काही वस्तू तर अशा आहेत, ज्यांचा वापर भारतीय लोक रोजच्या-रोज करत असतात. जाणून घेऊयात अशाच काही वस्तूंबद्दल. ज्या भारतात सहजपणे मिळू शकतात, पण परदेशातील बाजारांत शोधूनही सापडत नाहीत.

जगातील अनेक देशांत बंदी असलेले प्रोडक्ट्स भारतात मात्र, धडाक्यात विकले जात आहेत. यातील काही वस्तू तर अशा आहेत, ज्यांचा वापर भारतीय लोक रोजच्या-रोज करत असतात. जाणून घेऊयात अशाच काही वस्तूंबद्दल. ज्या भारतात सहजपणे मिळू शकतात, पण परदेशातील बाजारांत शोधूनही सापडत नाहीत.

डिस्प्रिन - डोकेदुखीपासून आराम मिळावा, यासाठी भारतीय लोक अनेकवेळा डिस्प्रिनसारख्या टॅबलेटचा वापर करतात. भारतीय बाजारात ती अगदी सहजपणे मिळते. मात्र, आंतरराष्ट्रीय मानकांवर अयशस्वी ठरल्याने हे औषध अमेरिका आणि युरोपातील देशांत बॅन आहे.

जेली स्वीट - जेली स्वीट - अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये जेली स्वीटवर पूर्णपणे बंदी आहे. हे मुलांच्या आरोग्यासाठी हानीकारक मानले जाते, कारण यामुळे मुलांना गुदमरल्यासारखे वाटल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मात्र, भारतीय बाजारांत हे सहजपणे मिळते.

किन्डर जॉय - किन्डर जॉय - अमेरिकेत बंदी असलेले किन्डर जॉय हे मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. अमेरिकन बाजारांत याच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र, भारतात मुले हे अत्यंत आवडीने खातात. आपल्याला आश्चर्यवाटेल, पण हे विकत घेऊन ठेवणे गुन्हा असून पावने दोन लाख रुपयांपेक्षाही अधिक दंड द्यावा लागू शकतो.

रेड बूल - भारतात तुरुणांमध्ये अत्यंत प्रसिद्ध असलेले रेड बूल एनर्जी ड्रिंक फ्रान्स आणि डेनमार्कसारख्या देशांत बॅन आहे. यूरोपियन देश लिथुआनियामध्येही रेड बुल 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांसाठी बॅन करण्यात आले आहे. या देशांतील हेल्थ अथोरिटीजचे म्हणणे आहे, की या ड्रिंकमुळे हार्ट अॅटॅक, डीहायड्रेशन आणि हायपरटेंशन सारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते.

डी कोल्ड टोटल- सर्दीसाठी दिली जाणारी डी-कोल्ड टोटलदेखील अनेक देशांत बॅन आहे. या देशांतील हेल्थ अथॉरिटीजने दावा केला आहे, की हे औषध किडणीसाठी अत्यंत घातक आहे. मात्र, भारतात हे औषध सहजपणे मिळते. या औषधाच्या जाहिरातीही आपण अनेक वेळा टीव्हीवर पाहत असाल.

लाइफबॉय साबन - लाइफबॉय साबन अमेरिकेत बॅन झाली आहे, हे आपल्याला माहीत आहे का? ही साबन आपल्या त्वचेसाठी हानीकारक असल्याचे कारण येथे दिले जाते. पण काही लोक या साबनाचा वापर कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी करतात. तर भारतात ही साबत प्रचंड लोकप्रीय आहे.

अनपाश्चराइज्ड मिल्क - अमेरिका आणि कॅनाडात अनपाश्चराइज्ड मिल्क बॅन आहे. हेल्थ अथॉरिटीजच्या मते, अनेक सूक्ष्म जीव आणि जीवानू असतात. यामुळे प्रकृतीवर घातक साइड इफेक्ट्स होत असतात. मात्र, भारतात हे दूध सहजपणे विक्रीसाठी उपलब्ध असते.

पेस्टीसाइड्स - DDT आणि अॅडोसल्फान सारखे जवळपास 60 हून अधिक हानीकारक कीटकनाशके परदेशात बॅन आहेत. ही कीटकनाशके फळं-भाज्यांच्या माध्यमाने शरिरात जातात आणि घातक आजारांचे कारण ठरतात. यामुळेच अनेक देशांत बॅन आहेत. तर भारतात पीक किटकांपासून वाचविण्यासाठी याचा प्रचंड वापर होतो.

निमुलिड - अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाशिवाय अनेक देशांत पेन किलर 'निमुलिड' वर अधिकृतपणे बंदी आहे. कारण ही लिव्हरसाठी अत्यंत हानीकारक आहे. भारतात हे औषध सहजपणे मिळते.

ऑल्टो 800 - भारतील रस्त्यांवर धावणारी ऑल्टो 800 कार ही अधिकांश मिडल क्लास कुटुंबांचे स्वप्न असते. पण तुम्हाला माहित आहे का? की हीच ऑल्टो आणि नॅनो सारखी कार 'ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट' क्लिअर न करू शकल्याने अनेक देशांत बॅन आहे.