Priya Nair HUL CEO : ट्रेनी ते CEO पर्यंत… कोण आहेत प्रिया नायर? ज्यांच्या हाती आली रिन, हॉर्लिक्स, लक्स तयार करणाऱ्या कंपनीची धुरा; रचला इतिहास
By जयदीप दाभोळकर | Updated: July 11, 2025 09:03 IST2025-07-11T08:45:59+5:302025-07-11T09:03:15+5:30
Priya Nair HUL CEO: त्या या कंपनीत एक ट्रेनी म्हणून जॉईन झाल्या होत्या. यापासून ते त्यांचा सीईओ बनवण्यापर्यंतचा प्रवास करा होता जाणून घेऊ.

Priya Nair Hindiustan Unilever: एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडमध्ये (HUL) मोठा बदल करण्यात आला आहे. प्रिया नायर १ ऑगस्टपासून कंपनीच्या नवीन एमडी आणि सीईओ बनणार आहेत. त्या रोहित जावा यांची जागा घेईल.
रोहित जावा यांचा भारतात केवळ दोन वर्षांचा कार्यकाळ होता, जो एचयूएलच्या कोणत्याही एमडीचा सर्वात कमी कार्यकाळ होता. प्रिया नायर सध्या युनिलिव्हरमध्ये ब्युटी अँड वेलबीइंग बिझनेसच्या प्रेसिडेंट आहेत. त्या एचयूएलच्या पहिल्या महिला सीईओ असतील. या बदलामुळे कंपनीत नव्या आशा निर्माण झाल्या आहेत.
"प्रिया यांची कंपनीत उत्तम कारकीर्द आहेत. भारतीय बाजारपेठेची समज आणि त्यांच्या उत्तम ट्रॅक रेकॉर्डसह प्रिया एचयूएलची कामगिरी आणखी शिखरावर घेऊन जातील," असं एचयूएलचे चेअरमन नितीन परांजपे म्हणाले.
प्रिया नायर १९९५ मध्ये एचयूएलमध्ये सामील झाल्या. त्यांनी होम केअर, ब्युटी अँड वेल-बीइंग आणि पर्सनल केअर व्यवसायांमध्ये सेल्स आणि मार्केटिंगमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. प्रिया यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पुणे येथून एमबीए केलंय. त्या एचयूएलमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉईन झाल्या होत्या. मूळ कंपनीत येण्यापूर्वी, प्रिया या एचयूएलमध्ये होम केअर आणि ब्युटी अँड पर्सनल केअर पोर्टफोलिओचे नेतृत्व करत होत्या.
सध्या, प्रिया या युनिलिव्हरमधील ब्युटी अँड वेलबीइंग बिझनेस ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. हा तब्बल १२ अब्ज युरोचा व्यवसाय आहे. या व्यवसायात हेअर केअर, स्किन केअर, प्रेस्टीज ब्युटी आणि हेल्थ अँड वेलबीइंग (विटामिन्स, सप्लिमेंट्स) असे चार मुख्य स्तंभ आहेत.
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयूएल) ही भारतातील सर्वात मोठी फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपनी आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये एचयूएलची उलाढाल ६०,६८० कोटी रुपये होती. त्याचं बाजार भांडवल (मार्केट कॅप) ५,६९,२२३.७३ कोटी रुपये आहे. यामुळे ती भारतातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक बनली आहे.
एचयूएलचे ५० पेक्षा जास्त ब्रँड आहेत जी बहुतांश घरांमध्ये दिसून येतात. यामध्ये लक्स, लाइफबॉय, सर्फ एक्सेल, रिन, व्हील, पॉन्ड्स, व्हॅसलीन, लॅक्मे, डव्ह, क्लिनिक प्लस, ब्रुक बाँड, हॉर्लिक्स, किसान आदींचा समावेश आहे. हे ब्रँड साबण, चहा, डिटर्जंट, शॅम्पू, स्किनकेअर, टूथपेस्ट आणि पॅकेज्ड फूड अशा २० पेक्षा जास्त ग्राहक श्रेणींमध्ये उपस्थित आहेत.