शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Paytm IPO पूर्वी सर्व चिनी सदस्य पेरेंट कंपनीच्या बोर्डावरून हटले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 5:43 PM

1 / 10
Paytm चा IPO लवकरच येण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीचा आयपीओ येण्यापूर्वीच One97 Communication च्या संचालक मंडळावरून सर्व चिनी नागरिक हटले आहेत.
2 / 10
यामध्ये प्रमुख गुंतवणूकदार Ant समुहाच्या प्रतिनिधिंचाही समावेश असेल. या समुहाचं प्रतिनिधीत्व आता अमेरिकेतील फ्लोरिडा येथील डॉगलस फिगिन हे करणार आहेत.
3 / 10
Paytm नं याच वर्षी आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा आयपीओ २१,८०० कोटी रूपयांचा असू शकतो. पेटीएम या कंपनीचं संचालन One97 Communication द्वारे करण्यात येतं.
4 / 10
या कंपनीच्या जवळपास ३९ सब्सिडायरीस आहेत. पेटीएमच्या प्रमुख शेअरधारकांमध्ये चीनच्या अलिबाबा समुहाच्या अँट ग्रुप, सॉफ्टबँक व्हिजन फंड, सॅफ पार्टनर्स यांचा समावेश आहे. विजय शेखर शर्मा यांची यात १४.६७ टक्के भागीदारी आहे.
5 / 10
पेटीएमची पेरेंट कंपनीनं रजिस्ट्रार ऑफ कंपनीजला दिलेल्या माहितीनुसार Ant फायनॅन्शिअलचे गुओमिंग चेंग आणि अलिपेचे जिंग शियांगडोंग यांनी कंपनीतील आपलं पद सोडलं आहे. हे दोन्ही चिनी नागरिक आहेत.
6 / 10
त्यांच्याशिवाय अमेरिकन नागरिक मायकल युएन जेयाओ आणि चिनी नागरिक तिंग हांग केन्नी यांनीदेखील आपलं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
7 / 10
संचालक मंडळात ज्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये Ant Group च्या Douglas Feagin यांचा समावेश आहे. ते अमेरिकेचे नागरिक आहेत. त्यांनी यापूर्वी गोल्डमॅन सॅक्ससोबत काम केलं होतं.
8 / 10
त्यांच्याशिवाय भारतीय नागरिक अशित लिलानी आणि विकास अग्निहोत्री यांचादेखील कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. लिलानी हे Saama कॅपिटलचे प्रतिनिधी आहेत, तर अग्निहोत्री हे जपानच्या सॉफ्ट बँकचे प्रतिनिधी आहेत.
9 / 10
One97 Communications कंपनी पेटीएमचा आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. तसंच या अंतर्गत कंपनी आपला २५ टक्के हिस्सा शेअरधारकांना देऊ शकते.
10 / 10
याशिवाय कंपनीच्या संचालक मंडळानं ५.४ लाख इक्विटी शेअर्स कर्मचाऱ्यांना देण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे.
टॅग्स :Paytmपे-टीएमIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूकIndiaभारतchinaचीन