'टाईम'नं डबल होईल तुमचा पैसा, Post Office ची ही स्कीम आहे 'लै भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:30 AM2023-08-08T09:30:30+5:302023-08-08T09:48:09+5:30

तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय आहे. पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहे खास.

Post office Time Deposit Scheme: तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय आहे. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक प्रकारच्या लहान बचत योजना आणि एफडी स्कीम्स आहेत.

परंतु आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट स्कीम (TD Account) बद्दल सांगणार आहोत. यामध्ये तुम्हाला एसबीआयपेक्षा (State Bank of India) पेक्षा जास्त व्याज मिळेल. या योजनेत तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करू शकता.

यावेळी SBI मध्ये 5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 6.50 टक्के वार्षिक व्याज मिळत आहे. त्याच वेळी, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट व्याज दरांतर्गत 5 वर्षांच्या ठेवीवर वार्षिक 7.5 टक्के व्याज मिळत आहे.

तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही 1-3 वर्षांचा टाईम डिपॉझिट केले तर तुम्हाला 6.90 टक्के दरानं व्याज मिळेल. याशिवाय 5 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 7.5 टक्के दराने व्याज मिळेल.

जर तुम्ही टाइम डिपॉझिट स्कीममध्ये पैसे गुंतवले तर त्यावर तुम्हाला 7.5 टक्के दरानं व्याज मिळतं. यानंतर तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 9 वर्षे, 6 महिने म्हणजे 114 महिने लागतील.

जर तुम्ही या स्कीममध्ये 5 लाख लाख रुपये गुंतवसे, तर 7.5 टक्के दरानं पाच वर्षांमध्ये तुम्हाला मॅच्युरिटीवर 7,24,974 रुपये मिळतील. यामध्ये तुम्हाला व्याजापोटी 2,24,974 रुपयांचा लाभ मिळेल.

या योजनेत कोणतीही सिंगल व्यक्ती आपलं खातं उघडू शकते. याशिवाय, 3 प्रौढ व्यक्ती एकत्रित खातेदेखील (Time deposit Joint account) उघडू शकतात. त्याच वेळी, पालक 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या नावेही खातं उघडू शकतात.

टाइम डिपॉझिट स्कीममध्ये, आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे. खातं उघडताना नॉमिनेशनची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र मुदतीपूर्वी पैसे काढल्यास दंड आकारला जातो.