Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स

By जयदीप दाभोळकर | Updated: April 21, 2025 09:09 IST2025-04-21T08:59:28+5:302025-04-21T09:09:00+5:30

सामान्य गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अनेक उत्तम बचत योजना आहेत. पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते.

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते.

त्याचबरोबर ५५ वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त कर्मचारी या योजनेत गुंतवणूक करू शकतात. ५० वर्षांवरील आणि ६० वर्षांखालील निवृत्त संरक्षण कर्मचारीही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. मात्र, या दोघांसाठी अट अशी आहे की, त्यांनी निवृत्तीचा लाभ मिळाल्यानंतर १ महिन्याच्या आत गुंतवणूक केलेली असावी. या बचत योजनेवर सध्या ८.२ टक्के दरानं व्याज मिळत आहे.

एससीएसएस योजनेत किमान गुंतवणूक एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. जर तुम्ही ८.२% व्याजदरानं ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला वार्षिक २.४६ लाख रुपये मिळतील, जे दरमहा सुमारे २०,००० रुपये होतात.

१ एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी मध्ये तिमाही व्याज दिलं जातं. मुदतपूर्तीपूर्वी खातेधारकाचा मृत्यू झाल्यास खातं बंद करून ती रक्कम नॉमिनीला दिली जाते.

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणुकीवर कोणताही धोका नसतो कारण त्याची हमी सरकारकडून दिली जाते. यासोबतच एससीएसएस योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला बँक एफडीपेक्षा जास्त परतावा मिळतो ही चांगली गोष्ट आहे. आरबीआयनं रेपो दरात कपात केल्यानंतर बहुतांश बँकांनी एफडीवरील व्याज कमी केलं आहे.

एससीएसएस योजना हा एक उत्तम पर्याय आहे. ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत गुंतवणूक करून निश्चित परतावा मिळू शकतो. पोस्ट ऑफिस सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीममध्ये प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर वजावट मिळते.