Post Office च्या 'या' योजनेअंतर्गत मिळेल 16 लाखांचा फायदा; जाणून घ्या, काय आहे गुंतवणूक प्रक्रिया?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:29 AM2021-08-25T09:29:43+5:302021-08-25T09:39:47+5:30

Post Office : पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुद्धा चांगला परतावा मिळतो.

नवी दिल्ली : जर तुम्ही पूर्णपणे सुरक्षित गुंतवणूक शोधत असाल तर पोस्ट ऑफिस (Post Office) तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये सुद्धा चांगला परतावा मिळतो.

पोस्ट ऑफिसची छोटी बचत योजना चांगली असते. यामध्ये कमी किंमतीत गुंतवणूक केल्यास मोठी कमाई होते. अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेला पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit) म्हणतात. तुम्हाला त्यात चांगले परतावा मिळतो.

या योजनेच्या माध्यमातून तुम्ही फारच कमी पैशाने गुंतवणूक सुरू करू शकता. याशिवाय तुमचे पैसेही पूर्णपणे सुरक्षित राहतील. तुम्ही त्यात महिन्याला १०० रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.

तुम्ही कितीही गुंतवणूक करू शकता तरीही अधिकाधिक मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस RD डिपॉझिट खाते चांगल्या व्याजदरासोबत लहान हप्ते जमा करण्याची एक सरकारी हमी योजना आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेले RD खाते ५ वर्षांसाठी आहे. त्यापेक्षा कमी काळासाठी उघडत नाही. दर तिमाहीत (सालना दराने) ठेवींवरील व्याज कॅलक्युलेशन केले जाते. त्यानंतर प्रत्येक तिमाहीच्या शेवटी हे आपल्या खात्यात चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडले जाते.

इंडिया पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, RD योजनेवर सध्या ५.८ टक्के व्याज आकारले जात आहे. केंद्र सरकार दर तिमाहीत आपल्या सर्व छोट्या बचत योजनांमध्ये (small saving schemes) दर तिमाहीत व्याजदर जाहीर करते.

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत तुम्ही दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक १० वर्षांसाठी केली तर तुम्हाला म्यॅच्योरिटीवर १६,२६,४७६ लाख रुपये मिळतील.

जर तुम्ही RDचा हप्ता वेळेत जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हप्ता लांबणीवर पडल्यास तुम्हाला दरमहा एक टक्का दंड भरावा लागेल.

तसेच जर तुम्ही सलग 4 हप्ते जमा केले नाहीत, तर तुमचे खाते बंद होईल. मात्र, खाते बंद झाल्यावर पुढील २ महिने ते पुन्हा अॅक्टिव्ह करता येऊ शकते