रोज १०० रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, कळणारही नाही आणि ५ वर्षांत जमतील ₹२,१४,०९७
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 09:01 IST2025-01-23T08:47:48+5:302025-01-23T09:01:51+5:30
Post Office Investment Scheme : जे लोक कमी रकमेची बचत करून गुंतवणूक करतात आणि त्यावर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ही स्कीम खूप चांगली आहे.

Post Office Investment : बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये चालणारी आरडी पिगी बँकेसारखी असते. यात तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवू शकता. पिगी बँकेत पैसे जमा केल्यास व्याज मिळत नाही, फक्त बचत होते.
पण जर तुम्ही आरडीमध्ये गुंतवणूक केली तर ही स्कीम मॅच्युअर झाल्यावर व्याजासह पैसे परत करते. जे लोक कमी रकमेची बचत करून गुंतवणूक करतात आणि त्यावर कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यासाठी ही स्कीम खूप चांगली आहे.
जर तुम्हीही आरडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिसआरडीमध्ये पैसे गुंतवू शकता. या योजनेत ५ वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. दररोज १०० रुपयांची बचत करूनही जर तुम्ही यात गुंतवणूक केली तर ५ वर्षांत तुम्ही २,१४,०९७ रुपयांची भर घालता. ही रक्कम तुम्ही गरजेनुसार कुठेही वापरू शकता.
जर तुम्ही रोज १०० रुपये वाचवले तर एका महिन्यात ३,००० रुपयांची भर पडेल. अशा प्रकारे तुम्ही दर महा पोस्ट ऑफिसआरडी स्कीममध्ये ३ हजार रुपये गुंतवू शकता. ३ हजार प्रमाणे तुम्ही वार्षिक ३६ हजार रुपये जमा कराल. अशा प्रकारे तुम्ही ५ वर्षात एकूण १,८०,००० रुपयांची गुंतवणूक कराल.
सध्या या योजनेवर ६.७ टक्के व्याज मिळत आहे. यानुसार ५ वर्षात तुम्हाला ३४,०९७ रुपये व्याज आणि मॅच्युरिटीवर २,१४,०९७ रुपये मिळतील. अशा प्रकारे थोडी बचत केल्यास तुम्ही चांगली रक्कम जोडू शकाल आणि तुम्हाला कळणारही नाही. पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, पोस्ट ऑफिसमध्ये १०० रुपयांपेक्षा कमी रकमेत आरडी खातं उघडता येतं, तर त्यात गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
जर तुम्हाला ५ वर्षांनंतरही आरडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही पुढील ५ वर्षांसाठी तो वाढवू शकता. या खात्यावर खातं उघडताना जे व्याज लागू होतं तेवढंच व्याज मिळेल. मुदतवाढीदरम्यान विस्तारित खाते केव्हाही बंद केले जाऊ शकते.
यामध्ये आरडी खात्याचा व्याजदर पूर्ण वर्षांसाठी लागू असेल आणि एक वर्षापेक्षा कमी वर्षासाठी बचत खात्यावर व्याज दिलं जाईल. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक्सटेंडेड अकाउंट २ वर्ष ६ महिन्यानंतर बंद केलं तर तुम्हाला २ वर्षांसाठी ६.७ टक्के दरानं व्याज मिळेल, तर ६ महिन्यांच्या रकमेवर पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंटनुसार म्हणजेच ४% व्याज मिळेल.
गरज पडल्यास पोस्ट ऑफिस आरडी ५ वर्षापूर्वीच बंद करू शकता. खातं उघडल्याच्या तारखेपासून तीन वर्षांनंतर तुम्हाला ही सुविधा मिळते. पण जर तुम्ही मॅच्युरिटी पीरियडच्या एक दिवस आधीही खातं बंद केले तर तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंटइतकं व्याज दिलं जातं. सध्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर ४ टक्के व्याज मिळत आहे.