टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:12 IST2025-10-14T13:08:45+5:302025-10-14T13:12:17+5:30

Post Office PPF Investment : जर तुम्हाला दीर्घकाळात मोठा निधी जमा करायचा असेल तर पोस्ट ऑफिसची योजना तुमच्यासाठी योग्य आहे.

पोस्ट ऑफिसची PPF योजना सरकारी हमीसह येते, ज्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात आणि दीर्घकाळात नियमित बचत करून लाखोंचा मोठा फंड तयार करता येतो.

जर तुम्ही दर महिन्याला फक्त ₹१२,५०० रुपये PPF मध्ये जमा केले, तर १५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर तुमचा एकूण फंड अंदाजे ४० लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

या योजनेवर सध्या वार्षिक सुमारे ७.१% दराने व्याज मिळते. महत्त्वाचे म्हणजे, या व्याजाच्या रकमेवर कोणताही कर लागत नाही, ज्यामुळे हा पर्याय कर वाचवू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

सामान्य माणूसही या योजनेचा लाभ घेऊ शकेल यासाठी तुम्ही अगदी कमी म्हणजे ₹५०० रुपयांपासून यामध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.

तुमच्या सोयीनुसार तुम्ही दर महिना किंवा वार्षिक गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख पर्यंतची रक्कम PPF मध्ये जमा करू शकता.

PPF मधील गुंतवणूक १५ वर्षांसाठी लॉक-इन असते, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते. मॅच्युरिटीनंतर तुम्ही ही योजना ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता.

गुंतवणूक केल्यानंतर १ वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही PPF खात्यातून कर्ज घेऊ शकता, तसेच ५ वर्षांनंतर गरज पडल्यास आंशिक पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

EPF प्रमाणेच PPF मध्ये केलेली गुंतवणूक आयकर कायद्याच्या कलम ८०C अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र ठरते, ज्यामुळे तुम्हाला दुहेरा फायदा मिळतो.