शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Post Office च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, 3 दिवसांनी बदलणार अनेक नियम, पटकन उरकून घ्या 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 8:17 PM

1 / 7
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसच्या (Post Office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून पोस्ट ऑफिस योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे.
2 / 7
जर तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस स्कीममध्ये खाते उघडले असेल, तर तुम्हाला आधीच माहित असले पाहिजे की कोणते नियम बदलले जात आहेत.
3 / 7
1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नियमांनंतर, ग्राहकांना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बचत खाते किंवा बँक खाते उघडावे लागेल. पोस्ट ऑफिसने परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
4 / 7
पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, 1 एप्रिलपासून ग्राहकांना एमआयएस (MIS), एससीएसएस (SCSS) आणि मुदत ठेव (Term Deposit) योजनांवर मिळणारे व्याज रोखीने दिले जाणार नाही. दरम्यान, पेमेंट फक्त पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात किंवा खातेदाराच्या बँक खात्यात केले जाईल.
5 / 7
जर कोणत्‍याही खातेदाराने त्‍याच्‍या बँक डिटेल्स लिंक केले नाही, तर त्‍याचे व्‍याज एकतर चेकच्‍या स्‍वरूपात दिले जाईल किंवा तुमच्‍या पोस्ट ऑफिस बचत खात्यात जमा केले जाईल.
6 / 7
पोस्ट ऑफिसच्या या नियमानुसार, ग्राहक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक कोणत्याही आधारावर पैसे घेतो, त्याचे खाते असणे आवश्यक आहे. तुमचे आधीच बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असल्यास ते पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत खात्याशी लिंक करा.
7 / 7
सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बचत खात्याशिवाय, लहान बचत खात्यात व्याज मिळणार नाही. त्यामुळे 31 मार्च 2022 पूर्वी हे महत्त्वाचे काम उरकून घेऊ शकता.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँकMONEYपैसा