मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 14:29 IST2025-07-25T13:55:10+5:302025-07-25T14:29:28+5:30
Inder Jaisinghani : मुंबईतील चाळीत जन्मलेल्या एक व्यक्ती आज १ लाख कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. तुम्ही देखील तुमच्या घरात या कंपनी वस्तू नक्की वापरत असाल.

अंबानींपासून अदानींपर्यंत देशातील अनेक अब्जाधीश कुटुबांची कहाणी मध्यमवर्गीय कुटुंबातून झाली आहे. मात्र, आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर आज ते जगातील श्रीमंतांच्या यादीत पोहचले आहे. अशीच एका उद्योजकाची कहाणी आहे, जे कधीकाळी मुंबईतील एका साध्या रस्त्यावरील लोहार चाळीत राहत होते.
एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या इंदर यांचे आयुष्य त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे बदलले. त्यावेळी ते फक्त १५ वर्षांचे होते. आपण बोलतोय 'पॉलीकॅब' कंपनीचे संस्थापक अध्यक्ष इंदर जयसिंघा यांच्याविषयी.
१९६८ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर, त्यांनी आपला मोठा भाऊ गिरधारी यांच्यासोबत कुटुंबाचा छोटासा इलेक्ट्रिकल व्यवसाय हाती घेतला. कुठलीही पदवी हाताशी नसताना इंदर यांनी आपल्या समजुतीने व्यवसाय पुढे नेला.
१९८० च्या दशकात त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा समजून घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना यशाची शिडी चढण्यास मदत झाली. त्यांचा छोटासा व्यवसाय हळूहळू वाढू लागला.
इंदर जयसिंघानी यांनी १९८६ मध्ये त्यांच्या भावांसोबत एक ट्रेडिंग फर्म सुरू केली. सुरुवातीला ते बाजारात इतर कंपन्यांच्या वस्तू कमिशनवर पुरवत असत.
जानेवारी १९९६ मध्ये पॉलीकॅब इंडियाचे मुंबईतील मुख्य कार्यालय सुरू झाले. त्यानंतर, डिसेंबर १९९७ मध्ये त्यांची कंपनीचे अध्यक्ष आणि संचालक म्हणून नियुक्ती झाली.
त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने फक्त तारा आणि केबल्सच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन सुरू केले. २०१९ मध्ये ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यांनी पंखे, दिवे, स्विचेस आणि स्मार्ट होम सिस्टिम यांसारख्या नवीन क्षेत्रात यशस्वीपणे प्रवेश केला.