PM SVANidhi Yojana : कोणत्याही हमीशिवाय पीएम स्वनिधी योजनेत मिळेल 80 हजार रुपयांपर्यंत कर्ज! कसा करावा अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:37 IST2024-12-24T12:49:03+5:302024-12-24T13:37:03+5:30
PM SVANidhi Yojana : या कर्ज योजनेसाठी तुम्हाला हमी म्हणून काहीही देण्याची गरज नाही.

PM SVANidhi Yojana : तुम्ही लहान व्यापारी आहात आणि तुम्हाला वर्किंग कॅपिटलसाठी तातडीने पैशांची गरज आहे. परंतु यासाठी तुमच्याकडे हमी देण्यासारखं काहीही नाही. त्यामुळं तुम्हाला कर्ज घेणं कठीण होऊ शकतं.
जर तुम्ही स्थानिक सावकार किंवा कोणत्याही मायक्रो फायनान्स कंपनीकडे गेलात तर तुम्ही चढ्या व्याजाच्या भयंकर कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता. अशा परिस्थितीत भारत सरकारची कर्ज योजना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते.
या कर्ज योजनेसाठी तुम्हाला हमी म्हणून काहीही देण्याची गरज नाही. तुमचे आधार कार्ड दाखवून तुम्ही त्वरित कर्ज मिळवू शकता. तेही 80 हजार रुपयांपर्यंतची रक्कम तीन हप्त्यांमध्ये मिळू शकते. याची परतफेड करण्यासाठी अत्यंत कमी व्याजदरात सुलभ हप्ते निश्चित करण्यात आले आहेत.
हे विशेषतः अशा लोकांसाठी फायदेशीर आहे, जे पहिल्यांदाच लहान व्यवसाय सुरू करणार आहेत. दरम्यान, रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणाऱ्यांचे खेळते भांडवल (वर्किंग कॅपिटल) लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेचे नाव पीएम स्वानिधी योजना असे आहे.
कसं मिळतंय कर्ज?
तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे या कर्जासाठी अर्ज करताच, तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणून 10,000 रुपये मिळतील. तुम्ही त्याची परतफेड करताच तुम्हाला 20 हजार रुपये कर्जाचा दुसरा हप्ता मिळेल. त्यानंतर दुसरा हप्ता भरल्यानंतर 50 हजार रुपयांचा तिसरा हप्ता मिळतो.
1200 रुपयांची वार्षिक कॅशबॅक मिळते
पीएम स्वनिधी योजनेंतर्गत सात टक्के दराने व्याज अनुदानही दिले जाते. याशिवाय, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी, वार्षिक 1200 रुपयांचा कॅश बॅक देखील दिला जातो. या योजनेचा लाभ नागरी संस्थांमार्फत घेतला जातो. यासाठी अर्जाची प्रक्रियाही पूर्ण करावी लागते.