शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Scheme: 12 रुपयांची गुंतवणूक अन् 2 लाखांचा फायदा, 'या' सरकारी योजनेत मिळतोय मोठा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 6:17 PM

1 / 8
Investment Scheme: तुम्हाला कमी गुंतवणुकीत जास्त फायदा मिळवायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी; आहे. सरकारने 'प्रधानमंत्री विमा सुरक्षा' योजनेच्या नावाने कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी एक स्कीम सुरू केली होती.
2 / 8
या योजनेत तुम्हाला फक्त 12 रुपयांच्या गुंतवणुकीत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. एवढेच नाही तर या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्हाला इतर अनेक फायदेही मिळतात.
3 / 8
ही सरकारच्या लोककल्याणकारी योजनांपैकी एक असल्यामुळे ही गुंतवणूक पूर्णपणे जोखमीरहित आहे. या योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे.
4 / 8
या योजनेत प्रीमियमची रक्कम तुमच्या बँक खात्यातून दरवर्षी 1 जून रोजी ऑटो डेबिट सुविधेद्वारे कापली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे.
5 / 8
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत तुम्हचा अपघात किंवा अपंगत्व आल्यास मदत दिली जाते. या योजनेंतर्गत, विमाधारकास 2 लाख रुपयांचे अपघात संरक्षण मिळते.
6 / 8
विमा संरक्षणाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एका वर्षात 12 रुपये प्रीमियम भरावा लागतो. 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
7 / 8
या योजनेत सामील झाल्यानंतर तुम्ही अंशतः अपंग झाल्यास, तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळेल. तर, मृत्यू किंवा पूर्ण अपंग झाल्यावर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.
8 / 8
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावे लागेल. तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आणि त्यात खाते उघडू शकता.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय