paytm offer book lpg cylinder and get gold worth rs 10 thousand everyday know how to apply
Paytm LPG Booking Offer: Paytm ची भन्नाट ऑफर! LPG बुक करा अन् १० हजारांचे सोने मिळवा; पाहा, डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 10:24 AM1 / 12आताच्या घडीला देशात नवरात्रीची धूम सुरू आहे. देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकविध कंपन्या सरसावल्या आहेत.2 / 12कोरोना संकट काळातून देश हळूहळू सावरत असून, उद्योगही गती पकडताना दिसत आहेत. कंपन्यांच्या विविध ऑफरचा लाभ ग्राहकांनाही मिळत आहे. 3 / 12यातच आता Paytm ने आपल्या युझर्ससाठी भन्नाट ऑफर आणली आहे. यानुसार आता LPG सिलेंडर बुक केल्यानंतर युझर्सना १० हजार रुपयांचे सोने जिंकण्याची संधी मिळणार आहे. 4 / 12दुसरीकडे LPG सिलेंडरच्या किंमती वाढल्या असल्या तरी तुम्हाला गॅस बुकिंगवर Paytm कडून बंपर ऑफर दिली जात आहे. नवरात्रीच्या दृष्टीने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. या ऑफरमध्ये एलपीजी गॅस बुक केल्यावर तुम्ही २४ कॅरेट सोने जिंकू शकता. 5 / 12Paytm ने याची सुरुवात केली आहे. या ऑफरला नवरात्री गोल्ड ऑफर असे नाव देण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला पेटीएमच्या 'बुक गॅस सिलेंडर' फीचरचा वापर करून या ऑफरचा लाभ घ्यावा लागेल.6 / 12Paytm ऑफरनुसार, दररोज ५ लकी ड्रॉ काढले जातील. प्रत्येक विजेत्याला पेटीएमकडून १०,००१ रुपयांचे सुवर्ण जिंकण्याची संधी मिळेल. यासह, या ऑफरमध्ये सहभागी होणारे सर्व लोक, ते जिंको अगर नको, त्यांना निश्चितपणे १०० रुपयांचे बक्षीस मिळेल, असे सांगितले जात आहे. 7 / 12ही ऑफर सुरू असून, ७ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीदरम्यान युझर्स या ऑफरचा लाभ मिळवू शकतील. जर तुम्ही ७ तारखेपूर्वी सिलिंडर बुक केले असेल पण पैसे भरले नसीतल तर तुम्हीही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. आपल्याला Paytm द्वारे गॅस एजन्सी किंवा विक्रेत्याला पैसे द्यावे लागतील.8 / 12गॅस बुक करण्यासाठी प्रथम तुम्हाला बुक गॅस सिलेंडरवर क्लिक करावे लागेल. यानंतर आपला गॅस पुरवठादार जे एचपी किंवा भारत किंवा इंडेन असेल ते निवडा. तुमचा मोबाईल नंबर, एलपीजी आयडी आणि ग्राहक क्रमांक टाका. आता तुमचा पेमेंट मोड निवडा.9 / 12यामध्ये तुम्ही पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड्स, नेट बँकिंग निवडू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण पेटीएम पोस्टपेड पर्याय देखील निवडू शकता. भरणा केल्यावर, तुमचे गॅस सिलेंडर बुक केले जाईल.10 / 12सणांचा हंगाम पाहता पेटीएमने ही ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ कॅशबॅक मिळत नाही, तर बक्षिसेही दिली जात आहेत. यानंतर, पेटीएमकडून दररोज ५ भाग्यवान विजेत्यांना २४ कॅरेट सोने दिले जात आहे. 11 / 12तुम्ही इंडेन, एचपी किंवा भारत गॅस जे काही सिलेंडर वापरता, तुम्हाला प्रत्येक कंपनीसोबत गॅस बुकिंगवर या ऑफरचा लाभ दिला जात आहे. 12 / 12सिलेंडर बुक केल्यानंतर, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला एक स्क्रॅच कार्ड मिळेल जे बुकिंगच्या दुसऱ्या दिवशी स्क्रॅच करावे लागेल. हा कोड तुम्हाला विजेता आहे की नाही हे सांगेल. आणखी वाचा Subscribe to Notifications