OnePlus ने लॉन्च केला पहिला फोल्डेबल फोन, पाहा किंमत अन् फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 09:17 PM2023-10-19T21:17:04+5:302023-10-19T21:25:01+5:30

OnePlus Open Launch : आज मुंबईत झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये OnePlus ने आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे.

OnePlus Open Launch Event : प्रसिद्ध मोबाईल ब्रँड OnePlus ने आपला पहिला फोल्डेबल फोन OnePlus Open लॉन्च केला. मुंबईत झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये एमराल्ड ग्रीन आणि व्हॉयजर ब्लॅक, या दोन कलर ऑप्शनमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला आहे.

OnePlus ने त्यांच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त OnePlus Open फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. वनप्लस ओपन फोल्डेबल फोनची बॉडी स्टेनलेस स्टील, टायटॅनियम फ्रेम आणि कार्बन फायबरपासून बनवली आहे. तरीदेखील वजन अवघे 238 ग्रॅम आहे, त्यामुळे हा सहजपणे कॅरी करता येते.

वनप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये फ्लॅगशिप इमेज क्वालिटी देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी यात तीन पॉवरफुल सेन्सर्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये प्रायमरी सेन्सर 48MP Sony LYT-T808 पिक्सेल स्टॅक आहे.

कमी प्रकाशात शूटिंग आणि फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP टेलिफोटो कॅमेरा दिला आहे, जो 3x झूम आणि 6x झूम सेटिंग्जसह येतो. फोनमध्ये AI सपोर्ट सेन्सरसह Ultra res Zoom देखील आहे.

OnePlus Open फोल्डेबल फोनचा डिस्प्ले फोल्ड केल्यावर 6.31 इंच आहे, पण ओपन केल्यावर 7.82 इंच होतो. या फोनद्वारे तुम्ही 4K व्हिडिओ देखील शूट करू शकता.

डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, LTPO 3.0, 10 बिट कलर आहे. तसेच, फोनची पीक ब्राइटनेस 2800 nits आहे. वनप्लस ओपन फोल्डेबल फोनमध्ये ऑक्सिजन ओएस देण्यात आली आहे, जी तुम्हाला मल्टी टास्किंग देते.

या 5G सपोर्टिव्ह OnePlus Open फोल्डेबल फोनमध्ये एकाच वेळी दोन टॅब उघडू शकता. त्याचबरोबर हा फोन गेमिंगच्या बाबतीतही अतिशय चांगला आहे.

OnePlus ने फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिले आहे, जे 16GB LPDDR5X रॅम आणि 512GB UFS4.0 स्टोरेजसह येते.

फोनमध्ये 4808 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फोन 1 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 42 मिनिटे लागतात.

OnePlus चा हा फोन 1,39,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. प्री-बुकिंग 19 ऑक्टोबरपासून, म्हणजेच आजपासून OnePlus च्या अधिकृत साइट आणि ई-कॉमर्स साइट Amazon वर सुरू झाली आहे.

OnePlus Open फोल्डेबल फोनच्या प्री-बुकिंगवर तुम्हाला रु. 8000 चा ट्रेड बोनस आणि 12 महिन्यांचा नोकॉस्ट EMI मिळत आहे. तसेच, ICICI बँक कार्ड किंवा इन्स्टंट बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास 5000 रुपयांची सूट मिळेल. .

वनप्लस ओपन फोल्डेबल फोनचा पहिला सेल 27 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या फोनसह तुम्हाला Google One वर 6 महिन्यांसाठी 100GB जागा मिळेल, YouTube Premium चे 6 महिने सबस्क्रिप्शन, Microsoft 365 चे 3 महिने सबस्क्रिप्शन मिळेल.