1 / 12५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द होऊन काही वर्षे उलटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी ५०० आणि १००० रूपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 2 / 12परंतु आता हीच ५०० ची जुनी नोट तुम्हाला पैसाही कमवून देऊ शकते. यासाठी तुमच्याकडे ५०० रूपयांची कामाची नसलेली जुनी नोट असणं आवश्यक आहे. याच्या माध्यमातून तुम्ही हजारो रूपये कमवू शकता.3 / 12तुम्ही कदाचित विचार करत असाल की ५०० रूपयांच्या जुन्या नोटेमुळे आपल्याला कसे काय पैसे मिळतील, जेव्हा ती नोटही चलनात नाही.4 / 12परंतु हे सत्य आणि तुम्ही तुमच्या जुन्या नोटेच्या सहाय्यानं कोरोना काळातही घरी बसून मोठी रक्कम मिळवू शकता.5 / 12ज्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटांची छपाई करतं तेव्हा त्याची छपाई ही काळजीपूर्वक केली जाते. त्याचं पॅटर्न ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसारच ही नोट प्रिन्ट होत असते.6 / 12यामुळे या सर्व नोटा दिसण्यात एकसमान असतात. परंतु रिझर्व्ह बँकेकडून सुरू असलेल्या नोटेच्या छपाईत काही चूक असेल आणि ती बाजारात आली असेल तर ती नोट खास ठरते.7 / 12अशा नोटा अनेक लोकं मोठी किंमत देऊन विकत घेण्यासही तयार होत असतात. तुमच्याकडे जर जुनी नोट असेल तर त्यावर एकदा चेक करा की त्याच्या सीरिअल नंबर हा दोनदा तर प्रिन्ट झाला नाही ना?8 / 12जर असं असेल तर तुम्हाला त्या नोटेचे ५ हजार रूपयेही मिळू शकतात. 9 / 12जर तुमच्याकडे ५०० रूपयांची जुनी नोट असेल आणि त्याची कडा मोठी असेल, त्यावर अधिकचा पेपर असेल तर त्याच्या मोबदल्यात तुम्हाला १० हजार रूपये मिळू शकतात.10 / 12या नोटेची विक्री करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बेबसाईट oldindiancoins.com यावर भेट द्यावी लागेल.11 / 12या ठिकाणी तुमच्याकडे असलेल्या नोटेचा फोटो काढून सेलर म्हणून रजिस्टर करावं लागेस. तसंच यावर ऑन सेलचा टॅग लावावा लागेल.12 / 12यानंतर ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे ती लोकं त्यावर बोली लावण्यास सुरूवात करतील. जो युझर सर्वाधित बोली लावेल त्याला ही नोट देऊन तुम्ही अधिक पैसे कमावू शकता.