By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 10:35 IST
1 / 5तुम्ही या सणासुदीला इलेक्ट्रिक बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ओला इलेक्ट्रिक कंपनीने भन्नाट ऑफर आणली आहे. ओला इलेक्ट्रिकने होळीच्या मुहूर्तावर त्यांच्या S1 श्रेणीच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर फ्लॅश सेलची घोषणा केली आहे. 2 / 5या अंतर्गत, ग्राहकांना S1 Air वर २६,७५० रुपयांपर्यंत आणि S1 X+ (जनरेशन २) वर २२,००० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे ८९,९९९ रुपये आणि ८२,९९९ रुपयांपासून सुरू होते.3 / 5हा फ्लॅश सेल १३ मार्च ते १७ मार्च या कालावधीसाठी मर्यादित आहे. यासोबतच, Ola त्यांच्या S1 रेंजमधील बाकीच्या स्कूटर्सवर २५,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे, ज्यामध्ये S1 Gen ३ रेंजमधील सर्व स्कूटर्सचा समावेश आहे.4 / 5या डिस्काउंटनंतर त्यांची किंमत ६९,९९९ ते १,७९,९९९ रुपयांच्या दरम्यान असेल. याशिवाय ओला १०,५०० रुपयांपर्यंत सूट देत आहे.5 / 5ओला इलेक्ट्रिक कंपनी पुन्हा एकदा मार्गेटमध्ये आपला दबदबा कायम करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.