शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता मालदीव नाही, लक्षद्वीपला जायचं! MakeMyTrip देतंय मोठी ऑफर, ३ जण जाणार असाल तर होईल फायदाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 9:27 AM

1 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर अनेकांनी लक्षद्वीपला जाण्याचे प्लॅन केले आहेत. MakeMyTrip सारख्या ट्रॅव्हल एग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर बुकिंगसाठी मोठ्या संख्येने लोक ट्रॅव्हल पॅकेजेस शोधत आहेत.
2 / 7
मालदीवसोबतच्या वाढत्या वादानंतर लक्षद्वीप अनेक दिवसांपासून गुगलवर ट्रेंडवर आहे. तुम्हीही अरबी समुद्रातील या द्वीपसमूहात जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
3 / 7
आगत्ती बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात प्रसिद्ध बेट आहे. येथे विमानतळ बांधण्यात आले आहे. दिल्‍ली ते अगाटी बेटापर्यंतच्‍या फ्लाइटला १२ ते २५ तास लागू शकतात, हे मार्गावरील थांब्‍यांच्या संख्येवर अवलंबून आहे.
4 / 7
MakeMyTrip प्रोमो कोडद्वारे १०% पर्यंत सूट देत आहे. यामुळे १२,००० रुपयांचे तिकीट जवळपास १०,००० रुपयांपर्यंत कमी होणार आहे. पण, हे फक्त पहिल्या फ्लाइट बुकिंगवर उपलब्ध आहे. याशिवाय, किमान तीन प्रवाशांसाठी तिकीट बुक केले असल्यास, बोनस कूपनद्वारे २,५०० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
5 / 7
एकदा तुम्ही अगाट्टीला पोहोचलात की इतर बेटांवर जाणे खूप सोपे आहे. पर्यटकांना एका बेटावरून दुसऱ्या बेटावर नेण्यासाठी सागरी बोटी आणि हेलिकॉप्टर उपलब्ध आहेत.
6 / 7
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी खिल्ली उडवली होती. यावरुन जोरदार वाद सुरू झाले होते.
7 / 7
पीएम मोदी यांनी लक्षद्वीपला भेट देऊन निसर्ग सौंदर्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.
टॅग्स :lakshadweep-pcलक्षद्वीपNarendra Modiनरेंद्र मोदीMaldivesमालदीव