सतत रिचार्जचं टेन्शन नाही! Jio चा जबरदस्त प्लान, मिळतोय 5G अनलिमिटेड डेटा आणि कॉल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2024 13:31 IST
1 / 6Cheapest Reliance Jio 3999 rupees plan: रिलायन्स जिओनं या महिन्यात आपल्या टॅरिफच्या किंमतीत वाढ केली आहे. मोबाइल चालू ठेवण्यासाठी आता जिओ युजर्सना आपले खिसे पूर्वीपेक्षा अधिक जास्त रिकामे करावे लागणार आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ, एअरटेलव्यतिरिक्त व्होडाफोन आयडिया (व्हीआय) यांनीही आपले प्लान महाग केले आहेत.2 / 6पण जर तुम्ही जिओ युजर असाल आणि तुम्हाला सतत रिचार्ज करण्याचं टेन्शन नको असेल तर कंपनीकडे एक उत्तम प्रीपेड प्लॅन आहे. रिलायन्स जिओच्या ३,९९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता पूर्ण १ वर्ष आहे, म्हणजेच तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याचं टेन्शन येणार नाही. आज आम्ही तुम्हाला जिओच्या या परवडणाऱ्या प्लानबद्दल सविस्तर सांगत आहोत.3 / 6रिलायन्स जिओच्या ३९९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस म्हणजेच १ पूर्ण वर्ष आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटाप्रमाणे एकूण ९१२.५ जीबी ४जी डेटा मिळतो. प्लानमध्ये मिळणारा डेली डेटा संपल्यानंतर ग्राहक ६४ केबीपीएस स्पीडनं इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात.4 / 6जर तुम्ही जिओच्या ५जी नेटवर्कवर असाल तर तुम्ही अनलिमिटेड ५जी डेटाचा लाभ घेऊ शकता. याशिवाय जिओच्या या वार्षिक प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएसही फ्री मिळतात.5 / 6जिओच्या या रिचार्जसोबत ग्राहकांना फॅनकोडचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये जिओसिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचं सबस्क्रिप्शन देण्यात येतं. 6 / 6जिओ युजर्स जिओ टीव्ही मोबाइल अॅपच्या माध्यमातून फॅनकोड अॅक्सेस करू शकतात. प्लॅनसोबत मोफत देण्यात येणाऱ्या जिओ सिनेमा सब्सक्रिप्शनमध्ये जिओ सिनेमा प्रीमियम कंटेन्टचा अॅक्सेस मिळत नाही.