खात्य़ात पैसे नाहीत! ATM ट्रान्झेक्शन फेल झाल्यास किती चार्ज लागतो? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 19:22 IST
1 / 12आजकाल सारेच एटीएमचा पैसे काढण्यासाठी वापर करतात. बँकेत रांगेत उभे राहण्याची कटकट नको म्हणून हा पर्याय सोयीचा आहे. ही ATM सेवा देण्यासाठी बँका काही पैसेही वर्षाला कापून घेतात. मात्र, याशिवाय अन्य प्रकारेही बँका दंड स्वरुपात पैसे कापतात, याची तुम्हाला माहिती असायला हवी. 2 / 12मेट्रो आणि गैर मेट्रो शहरांमध्ये काही ट्रान्झेक्शन मोफत असतात. त्यापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास बँका चार्ज आकारतात हे तुम्हाला माहितीच आहे. 3 / 12परंतू खात्यात पुरेसे पैसे नाहीत आणि जर तुम्ही पैसे काढायला गेला तर तुम्हाला ट्रान्झेक्शन फेलचा मेसेज येतो. यावरही बँका चार्ज आकारतात. परंतू याचा मेसेज येत नसल्याचे आपल्याला जेव्हा निरखून महिन्याचे किंवा वर्षाचे बँक स्टेटमेंट पाहतो तेव्हा समजते. अनेकजण ते पाहतही नाहीत.4 / 12महत्वाचे म्हणजे स्टेट बँक SBI, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्र सारख्या सर्वच बँका अशाप्रकारचे शुल्क कापतात. अनेकदा आपल्या खात्यात तेवढे पैसे आहेत का याचीही आपल्याला माहिती नसते. यामुळे हा दंड लागतो. 5 / 12खरेतर बँका एसएमएस किंवा मिस कॉल सुविधेद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती देतात. यासाठी शुल्कही घेतले जाते. अनेकदा ग्राहक त्यांच्या खात्यात असलेल्या पैशांपेक्षा जास्त रक्कम काढायला जातात. तेव्हा हा दंड बसतो. 6 / 12बँकांद्वारे ट्रान्झेक्शन फेल झाल्यावर हा चार्ज आकारला जातो. यामुळे पैसे काढण्याआधी एकदा बॅलन्स चेक करावा. 7 / 12य़ाचबरोबर ग्राहकांना अशा वेळी बँक किती चार्ज आकारते याची माहिती असायल हवी. चला याबाबत जाणून घेऊया...8 / 12एसबीआयच्या नियमानुसार, एटीएममधून जेवढे पैसे काढायचे आहेत आणि तेवढे पैसे खात्यात नसतील तर तुमच्या प्रत्येक फेल ट्रान्झेक्शनला 20 रुपये दंड आणि जीएसटी शुल्क आकारले जाणार आहे. यामुळे आधी बॅलन्सची माहिती घेूनच पैसे काढावे लागणार आहेत.9 / 12भारताबाहेरील कोणत्याही मर्चंट आऊटलेटवर पुरेसे पैसे नसल्यास 25 रुपये आकारले जातात. 10 / 12अन्य बँकाच्या एटीएममध्ये फेल ट्रान्झेक्शन झाल्यास ग्राहकाकडून 25 रुपये चार्ज केले जातात. 11 / 12एटीएमच्या फेल ट्रान्झेक्शन वर ग्राहकाकडून 25 रुपये शुल्क आकारले जाते. 12 / 12एटीएमच्या फेल ट्रान्झेक्शन वर ग्राहकाकडून 25 रुपये शुल्क आकारले जाते.