१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 17:44 IST2025-07-26T17:33:14+5:302025-07-26T17:44:28+5:30
Rule Change In August News: जुलै महिना संपण्यास आता काही दिवस उरले आहेत. दरम्यान, येत्या १ ऑगस्टपासून काही महत्त्वपूर्ण नियमामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे या नियमांची माहिती न घेता या बदलांनुसार नियोजन न केल्यास तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. १ ऑगस्टपासून क्रेडिट कार्ड, यूपीआय, घरगुती गॅस सिलेंडर, बँकांच्या सुट्ट्या आणि विमानाच्या इंधनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. हे बदल कोणकोणते आहेत याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जुलै महिना संपण्यास आता काही दिवस उरले आहेत. दरम्यान, येत्या १ ऑगस्टपासून काही महत्त्वपूर्ण नियमामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे या नियमांची माहिती न घेता या बदलांनुसार नियोजन न केल्यास तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ शकतो. १ ऑगस्टपासून क्रेडिट कार्ड, यूपीआय, घरगुती गॅस सिलेंडर, बँकांच्या सुट्ट्या आणि विमानाच्या इंधनामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. हे बदल कोणकोणते आहेत याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये बदल
ऑगस्ट महिन्यामध्ये क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. जर तुम्ही एसबीआय कार्ड वापरत असाल तर ११ ऑगस्टपासून काही ब्रँडेड कार्ड्सवरील मोफत एअर अॅक्सिडेंट इन्शुरन्स संपुष्टात येणार आहे. आतापर्यंत एसबीआय, यूको बँक, सेंट्र्ल बँक, पीएसबी, करुर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँकेसोबत मिळून काही खास कार्ड्सवर ५० लाखांपासून १ कोटी रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. मात्र आता ही सुविधा बंद होणार आहे त्यामुळे कार्ड होल्डर्सनां धक्का बसू शकतो.
गॅस सिलेंडरच्या किमती
दरमहिन्याप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या १ तारखेला घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. जुलै महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत घट झाली होती. तर घरगुती गॅसच्या किमती जैसे थे रहिल्या होत्या.
यूपीआय पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये बदल
१ ऑगस्टपासून यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट करण्याऱ्यांसाठी नवे निवम लागू होणार आहेत. जर तुम्ही पेटीएम, फोन पे आणि गुगल पे वापरत असाल तर यूपीआयने त्यासाठी काही नव्या मर्यादा लागू केल्य आहेत. त्यानुसार तुम्हाला आता एका दिवसामध्ये केवळ ५० वेळाच बॅलन्स तपासता येणार आहे. तसेच मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यांमा केळ २५ वेळाच पाहता येणार आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या किमती
एप्रिल २०२५ पासून सीएनजी आणि पीएनजीच्या किमतींमध्ये फारसे बदल झालेले नाहीत. सध्या मुंबईत सीएनजी ७९.५० रुपये प्रतिकिलो आणि पीएनजी ४९ रुपये प्रति यूनिट किमतीने विकला जात आहे. आता ऑगस्ट महिन्यात या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
विमान इंधनाच्या किमती
विमानांसाठी वापरण्यात येणारं इंधन म्हणजेच एटीएफच्या किमतील १ ऑगस्टपासून बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानांच्या तिकिटांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात एवढे दिवस राहणार बँका बंद
ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांचं वेळापत्रकही समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात सणावारांची रेलचेल असल्याने या महिन्यात बँकांना भरपूर सुट्ट्या असणार आहेत. ऑगस्ट महिन्यात बँकांना एकूण १६ दिवस सुट्ट्या असून, प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्यांची संख्या बदलू शकते.