शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सिलेंडर बुकिंगसाठी आता द्यावी लागणार 'या' प्रश्नांची उत्तरे! पाहा BPCL चे १० नवे नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 16:08 IST

1 / 10
आता एका गॅस कनेक्शनवर एका महिन्यात जास्तीत जास्त २ सिलेंडरच बुक करता येतील. यापेक्षा जास्त बुकिंग करण्याचा प्रयत्न केल्यास सिस्टम तुमची विनंती ब्लॉक करू शकते.
2 / 10
एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) सरकार १२ सिलेंडरवर सबसिडी देते. या कोठ्याव्यतिरिक्त ग्राहक ३ विना-सबसिडीचे सिलेंडर घेऊ शकतो. म्हणजेच, वर्षाला एका कनेक्शनवर कमाल १५ सिलेंडरची मर्यादा असेल.
3 / 10
यापूर्वी पहिला सिलेंडर घेतल्यावर २१ दिवसांनी दुसरा सिलेंडर बुक करता येत असे. आता हा कालावधी वाढवून २५ दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच दोन सिलेंडरमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर असणे अनिवार्य आहे.
4 / 10
जर तुमचा १२ सिलेंडरचा वार्षिक कोटा संपला असेल आणि तुम्हाला अधिक सिलेंडर हवे असतील, तर तुम्हाला 'Hello BPCL' या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करावा लागेल.
5 / 10
जास्तीचा सिलेंडर मागताना ॲपद्वारे काही प्रश्न विचारले जातील. उदा. तुमच्या घरी लग्नकार्य किंवा काही विशेष कार्यक्रम आहे का? पाहुण्यांची संख्या किती आहे? तुमच्या उत्तरांच्या आधारेच जास्तीचा सिलेंडर द्यायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
6 / 10
सिलेंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल. हा कोड डिलिव्हरी बॉयला सांगितल्याशिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही.
7 / 10
गॅस बुकिंग केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरूनच करता येईल. जर तुमचा नंबर बदलला असेल, तर तो त्वरित गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा ॲपद्वारे अपडेट करणे आवश्यक आहे.
8 / 10
सरकारने सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. ज्यांचे केवायसी अपडेट नसेल, त्यांची सबसिडी रोखली जाऊ शकते किंवा बुकिंगमध्ये अडथळे येऊ शकतात.
9 / 10
संशयास्पद किंवा मर्यादेबाहेर बुकिंग आढळल्यास, एजन्सीकडून अतिरिक्त कागदपत्रांची किंवा प्रत्यक्ष पडताळणीची मागणी केली जाऊ शकते.
10 / 10
हे सर्व नियम प्रामुख्याने घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी आणि युद्धासारख्या परिस्थितीत पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये, यासाठी लागू करण्यात आले आहेत.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Hikeइंधन दरवाढ