भारतातील फेमस YouTuber,'तिची' कमाई ऐकून पायाखालची जमीन सरकेल; कव्हर करतेय World Economic Forum
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:26 IST2023-01-17T16:13:35+5:302023-01-17T16:26:13+5:30
Prajakta Koli : प्राजक्ताला मोस्टली सॅन (Mostly Sane) म्हणून ओळखले जातात.

स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos 2023) येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 चा (World Economic Forum 2023) वार्षिक कार्यक्रम सुरू झाला आहे. हे जगातील 6 नामांकित युट्यूबर्सद्वारे (YouTubers) देखील कव्हर केले जात आहे.
या युट्यूबर्सची अधिकृतपणे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 चा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. भारताची यूट्यूब स्टार आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी हिचाही या युट्यूबर्समध्ये समावेश आहे.
प्राजक्ताला मोस्टली सॅन (Mostly Sane) म्हणून ओळखले जातात. प्राजक्ता ही 29 वर्षीय कंटेंट क्रिएटर असून तिचे यूट्यूबवर 68 लाख फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या 73 लाख आहे.
प्राजक्ताने आपल्या कॉन्टेंटची सुरुवात शॉर्ट स्किट्स (प्ले) पासून केली. मात्र, हळूहळू तिचे चॅनल वाढत गेले आणि तिने ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि सेलिब्रिटींच्या मुलाखतीही सुरू केल्या.
प्राजक्ता मुंबईत राहते. Fabceleby या वेबसाइटनुसार तिची एकूण संपत्ती 16 कोटी रुपये आहे. दर महिन्याला ती जवळपास 40 लाख रुपये कमावते.
प्राजक्ताने नेटफ्लिक्सची सीरिज मिसमॅच्ड आणि अलीकडच्या जुग जुग जिओ या बॉलीवूड चित्रपटात काम केले. तिने फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्येही आपले स्थान बनवले आहे.
2017 मध्ये ओबामा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तिला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भेटण्यासाठी निमंत्रण मिळाले होते. दरम्यान, या वर्षी दावोसमध्ये महिला शिक्षण आणि हवामान बदलाबाबत उचलल्या जाणार्या पावले, यासंदर्भात दिली जाणारी माहिती प्राजक्ता कव्हर करणार आहे.
प्राजक्ता व्यतिरिक्त इतर युट्यूबर्स आहेत. ज्यांनी हा कार्यक्रम कव्हर केला आहे, त्यात नुसैर यासीनचा समावेश आहे, जो नास डेली (Nas Daily) नावाने यूट्यूब चॅनेल चालवतो. हा अरब-इस्त्रायली ब्लॉगर भारतातही खूप प्रसिद्ध आहे.