PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

By जयदीप दाभोळकर | Updated: April 26, 2025 09:19 IST2025-04-26T09:09:52+5:302025-04-26T09:19:41+5:30

PPF Trick: निवृत्तीसाठी अनेक योजना आखल्या जातात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हाही त्यापैकीच एक आहे. दीर्घ मुदतीत मोठी रक्कम जोडण्याच्या दृष्टीनं ही योजना खूप चांगली आहे. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता.

PPF Trick: निवृत्तीसाठी अनेक योजना आखल्या जातात, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हाही त्यापैकीच एक आहे. दीर्घ मुदतीत मोठी रक्कम जोडण्याच्या दृष्टीनं ही योजना खूप चांगली आहे. पीपीएफमध्ये तुम्ही वर्षाला कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता.

पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीपीएफच्या माध्यमातून विनायोगदान व्याज मिळवू शकता, तेही लाखोंमध्ये. पीपीएफवर व्याज मिळवण्याचा हा मार्ग मोठमोठे तज्ज्ञही सांगू शकत नाहीत. जाणून घेऊ हे कसं काम करेल.

पीपीएफमध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करू शकता. सध्या या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळत असून हे व्याज कंपाउंडिंग तत्त्वावर वाढतं. पीपीएफचा मॅच्युरिटी पीरियड १५ वर्षांचा आहे, पण तो तुम्हाला ५-५ वर्षांच्या ब्लॉकमध्ये दोनदा तो वाढवावा लागेल आणि गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल. म्हणजेच २५ वर्षांसाठी तुम्हाला वर्षाला दीड लाख रुपये जमा करावे लागतील.

पीपीएफमध्ये २५ वर्षे सलग १.५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ३७,५०,००० रुपये होईल आणि तुम्हाला ७.१ टक्के दरानं ६५,५८,०१५ रुपये व्याज मिळेल. अशा प्रकारे तुमच्या पीपीएफ खात्यात एकूण १,०३,०८,०१५ रुपये जमा होतील.

२५ वर्षांनंतरही तुम्हाला खात्यातून हे पैसे काढायचे नाहीयेत. असं केल्यास तुमच्या पीपीएफ खात्यात जेवढी रक्कम जमा होते, त्यावर पीपीएफच्या गणनेनुसार व्याज मिळतं. खातं मॅच्युअर झालं असल्यानं आपण या खात्यातून कधीही संपूर्ण पैसे काढू शकता किंवा ते त्यातच ठेवू शकता आणि ठेवीवर व्याज मिळवू शकता.

जर तुम्ही संपूर्ण १,०३,०८,०१५ रुपये खात्यात तसेच ठेवले तर ७.१% दरानं व्याजातून ७,३१,८६९ रुपये मिळतील. अशा प्रकारे योगदान न देता तुम्ही दरवर्षी व्याजातून लाखो रुपये कमवू शकता. जोपर्यंत हे पैसे जमा होत आहेत, तोपर्यंत त्यावर व्याज दिलं जात राहील.

पीपीएफ खात्याच्या योगदानासह ५-५ वर्षांच्या ब्लॉकपर्यंत वाढविण्यासाठी, आपल्याला खातं कुठेही असल्यास बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सादर करावा लागेल. मॅच्युरिटीच्या तारखेपासून १ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी आपल्याला हा अर्ज सादर करावा लागेल. पीपीएफ खात्यात २५ वर्षे योगदान देत राहण्यासाठी हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.