कोण होत्या लीलावती ज्यांच्या नावे बनलेल्या हॅास्पिटलमध्ये सैफ आहे भरती, कसं उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:51 IST
1 / 6Lilavati Hospital Saif Ali Khan : लीलावती हॉस्पिटल सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या मुंबईतील याच रुग्णालयात दाखल आलंय. अभिनेत्यावर चाकूनं वार केल्यानंतर त्याला इथं आणण्यात आलं. मुंबईतील बड्या आणि प्रसिद्ध लोकांमध्ये हे हॉस्पिटल खूप लोकप्रिय आहे. 2 / 6प्रसिद्ध हिरे व्यापारी कीर्तीलाल मेहता यांच्या पत्नी लीलावती मेहता यांच्या नावावरून या रुग्णालयाला लीलावती हे नाव देण्यात आलंय. १९९७ मध्ये लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट अंतर्गत याची स्थापना झाली. मुंबईतील वाढत्या आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्याच्या हेतूनं हा उपक्रम राबविण्यात आला. लीलावती रुग्णालय अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसाठी ओळखलं जातं.3 / 6कीर्तीलाल मेहता हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हिरे आणि दागिने व्यापारी होते. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी बर्मा (आता म्यानमार) येथे रुबी स्टोन्सचा व्यापार सुरू केला. १९४४ मध्ये त्यांनी मुंबईत 'ब्युटीफुल डायमंड्स' या नावाने हिऱ्यांचा व्यवसाय सुरू केला.4 / 6१९५३ मध्ये किर्तीलाल मेहता यांनी बेल्जियममधील अँटवर्प येथे 'गेम्बेल डायमंड्स'ची स्थापना केली, जे आज जागतिक हिऱ्याच्या बाजारात एक मोठं नाव आहे. त्यानंतर हाँगकाँग (१९५६), तेल अवीव (१९६८) आणि न्यूयॉर्क (१९७३) येथे त्यांनी शाखा उघडल्या. हळूहळू त्यांचा व्यवसाय आशिया, युरोप आणि अमेरिकेत पसरला. गेम्बेल समूह जगातील अग्रगण्य हिरे कंपन्यांपैकी एक बनला.5 / 6कीर्तीलाल मेहता यांचं २०१५ मध्ये निधन झाले. त्यावेळी ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. त्यांची अंदाजे संपत्ती कोट्यवधी डॉलर्समध्ये होती. मात्र, त्यांच्या नेटवर्थचा नेमका आकडा कळू शकलेला नाही. त्यांचा वारसा त्यांच्या कुटुंबाच्या आणि प्रस्थापित व्यवसायाच्या माध्यमातून टिकून आहे. कीर्तीलाल मेहता यांनी व्यवसायातील यशाबरोबरच समाजसेवेची ही सखोल बांधिलकी दाखवली. याच परोपकारी भावनेतून त्यांनी 'लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्ट'ची स्थापना केली.6 / 6ट्रस्ट सर्व वर्गातील लोकांना सुलभ आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा प्रदान करत आहे. आज लीलावती हॉस्पिटल त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. हे केवळ मुंबईतच नाही तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. उत्कृष्टतेसाठी त्याची प्रतिष्ठा अत्याधुनिक तंत्रज्ञान, एक अत्यंत कुशल वैद्यकीय टीम आणि रुग्णसेवेसाठी अढळ समर्पणावर आधारित आहे, ज्यामुळे ती एक प्रमुख आरोग्य सेवा संस्था बनली आहे.