LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या, प्लॅनची संपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:33 IST2022-11-14T11:22:06+5:302022-11-14T11:33:12+5:30
LIC Jeevan Akshay Policy : एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) योजना पुन्हा एकदा सुरु होत आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर मोठी कमाई पाहिजे असेल तर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India) 'या' योजनेत गुंतवणूक करू शकता.
यामुळे तुम्ही दरमहा जवळपास 36 हजार रुपये कमवू शकता. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराचा खर्च सहज उचलू शकता किंवा तुम्ही काही महत्त्वाचे कामही करू शकता. या योजनेद्वारे एलआयसी आपल्या गुंतवणूकदारांना दरमहा कमाई करण्याची संधी देत आहे. यासाठी जीवाची सुरक्षा व रुपयांची हमी सुद्धा मिळते.
LIC कडून एलआयसी जीवन अक्षय पॉलिसी (LIC Jeevan Akshay Policy) योजना पुन्हा एकदा सुरु होत आहे. या पॉलिसी अंतर्गत, तुम्ही फक्त एक हप्ता भरून आयुष्यभर कमाई करू शकता. दरम्यान, जीवन अक्षय पॉलिसी ही सिंगल प्रीमियम नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग (Single Premium Non Linked Non Participating) आणि पर्सनल अॅन्युटी प्लॅन (Personal Annuity Plan) आहे.
संपूर्ण योजना समजून घ्या...
या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला 36000 रुपये मिळवण्यासाठी Annuity Payable for life at a Uniform Rate चा ऑप्शन स्वीकारावा लागेल. यामध्ये तुम्हाला दरमहा एकरकमी पेन्शनची रक्कम मिळेल. जर तुमचे वय 45 वर्षे असेल आणि हा प्लॅन घेणार असाल, तर 70 लाख रुपयांचा सम एश्योर्ड ऑप्शन निवडला, तर त्याला 71,26,000 रुपयांचा एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा 36429 रुपये पेन्शन मिळेल. काही कारणाने व्यक्तीचा मृत्यू झाला तर पेन्शन बंद होते.
या वयोगटातील लोक घेऊ शकतात लाभ
35 ते 85 वर्षे वयोगटातील लोक एलआयसीचा हा प्लॅन घेऊ शकतात. याशिवाय दिव्यांग व्यक्ती या पॉलिसीचा लाभ घेऊ शकतात. या पॉलिसीमध्ये तुम्ही 10 प्रकारे पेन्शन मिळवण्याच्या पर्यायाचा लाभ घेऊ शकता.
दरमहा मिळेल पेन्शन
जर तुम्ही 75 वर्षांचे असाल. त्यामुळे तुम्हाला 610800 रुपयांचा एकरकमी प्रीमियम भरावा लागेल. यावर, त्याची सम एश्योर्ड रक्कम 6 लाख रुपये असणार आहे. यामध्ये वार्षिक पेन्शन 76 हजार 650 रुपये, सहामाही पेन्शन 37 हजार 35 रुपये, त्रैमासिक पेन्शन 18 हजार 225 रुपये असेल. दुसरीकडे, मासिक पेन्शन 6 हजार रुपये असेल. जीवन अक्षय योजनेंतर्गत वार्षिक 12000 रुपये पेन्शन मिळते.
कमी गुंतवणूकीचा मिळेल ऑप्शन
जर तुम्ही या प्लॅनमध्ये काही पैसे गुंतवू शकत असाल तर तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये पेन्शन मिळेल. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी जास्त पैसे असतील तर तुम्ही इतर दुसरे ऑप्शन घेऊ शकता. तुम्ही फक्त 1 लाख रुपये गुंतवून दरमहा कमवू शकता. 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला दरवर्षी 12000 रुपये मिळतील. या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.