LICच्या 'या' खास पॉलिसीवर मिळेल FD पेक्षा अधिक व्याज, मॅच्युरिटीवर मिळेल 17 लाखहून अधिक रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 06:48 PM2021-04-15T18:48:27+5:302021-04-15T18:59:51+5:30

लाइफ इन्शुरन्स कारपोरेशन (LIC) ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. लोकांच्या गरजांनुसार एलआयसी सातत्याने वेग-वेगळे प्लॅन्स आणत असते. एलआयसीने नुकताच एक असाच प्लॅन आणला आहे.

या प्लॅनमध्ये गुंतवणूक केल्यास बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट स्किमपेक्षाही अधिक व्याज मिळते. याशिवाय, यात गॅरंटेड बोनसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

एलआयसीतील गुंतवणूक कुठल्याही परिस्थितीत सुरक्षित असते. कारण एलआयसीत जमा केलेल्या पैशांवर सरकार सॉवरेन गॅरंटी (Sovereign Guarantee) देते. ही गॅरंटी बँकांत जमा केलेल्या पैशांवर मिळत नाही. तर जाणून घेऊया काय आहे एलआयसीची ही खास पॉलिसी...

गॅरंटेड इनकम - एलआयसी (LIC)च्या या प्लॅनचे नाव 'बीमा ज्योती' (Bima Jyoti) असे आहे. हा एक नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे. यात दरवर्षी एका निश्चित गुंतवणुकीनंतर गॅरंटेड रिटर्न्सची सुविधाही मिळते. या प्लॅनमध्ये मॅच्युरिटीनंतर जवळपास 17.5 लाख रुपयेही मिळतात.

किती मिळतो बोनस - बीमा ज्योती हा एक टर्म प्लॅन आहे. या पॉलिसीत प्रत्येक वर्षाच्या शेवटी 1 हजारच्या सम अशुर्डवर 50 रुपयांचे गॅरंटेड बोनस मिळते. एवढेच नाही तर 1 हजारच्या बेसिक सम अशुर्डवर 50 रुपयांची वेगळी गॅरंटीही मिळते.

मिनिमम सम अशुर्ड किती - एलआयसीच्या या प्लॅनमध्ये मिनिमम सम अशुर्ड 1 लाख रुपये आहे. यात कुठल्याही प्रकारची मॅक्झिमम लिमिट नाही. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकते.

प्रीमियम पेइंग टर्म - ही पॉलिसी 15 वर्षांसाठी घेतल्यास, प्रीमियम पेइंग टर्म (PPT) 10 वर्षांचा असेल. पॉलिसीचा अवधी वाढल्यास प्रीमियम पेइंग टर्मदेखील वाढतो.

पॉलिसीची 'खासियत' - एलआयसीची ही पॉलिसी ऑनलाईनसुद्धा घेतली जाऊ शकते. ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच, मॅच्युरिटीचे जास्तीत जास्त वय 75 वर्ष एवढे आहे.

या पॉलिसीत 5,10 आणि 15 वर्षांसाठी हप्त्याने मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिटचे ऑप्शन उपलब्ध आहे. पॉलिसी अवधीच्या तुलनेत 5 वर्ष आधिपर्यंतच प्रीमियम जमा करावे लागते.

15 वर्षांच्या पॉलिसीवर किती फायदा? - आपण 15 वर्षांची पॉलिसी घेतली असेल तर, त्याला 10 वर्षांपर्यंत प्रीमियम भरावे लागेल. ही रक्कम 82545 रुपये एवढी होईल. याशिवाय आपल्याला मॅच्युरिटीपर्यंत दरवर्षी 50 हजार रुपये मिळतील. ही रक्कम 7.50 लाख एवढी होईल. अशा प्रकारे 10 लाख रुपयांच्या पॉलीसीवर मॅच्युरिटीच्या वेळी आपल्याला 17.5 लाख रुपये मिळतील.