शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Higher Pension : हायर पेन्शन निवडण्याची अखेरची संधी, आज लास्ट डेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:41 AM

1 / 7
11 जुलै म्हणजेच मंगळवार ही हायर पेन्शनसाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. यावेळी अंतिम मुदत वाढण्याची शक्यता कमी आहे. गेल्या वेळीही कामगार मंत्रालयाच्या हस्तक्षेपामुळे बैठक बराच वेळ चालली होती.
2 / 7
अखेरची तारीख आणखी एक महिना वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु ईपीएफओ सदस्यांनी ती 15 दिवसांनी वाढवण्याचा अंतिम निर्णय घेतला. विशेष म्हणजे, ईपीएफओनं आधीच दोनदा याची मुदत वाढवली आहे.
3 / 7
EPFO ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांनी 5,000 रुपये किंवा 6,500 रुपयांच्या पूर्वीच्या वेतन मर्यादेपेक्षा जास्त वेतन योगदान दिलं आणि EPS-95 चे सदस्य असताना सुधारित योजनेसह EPS अंतर्गत निवड केली, ते हायर पेन्शनसाठी पात्र असतील.
4 / 7
हायर पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी, प्रथम https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ ई-सेवा पोर्टलवर जा. त्यानंतर होम पेजवर Pension on Higher पर्यायावर क्लिक करा.
5 / 7
यानंतर तुमच्या सिस्टमवर एक नवं पेज ओपन होईल. त्यानंतर त्या ठिकाणी Important links मधल्या हायर पेन्शन ऑप्शनवर क्लिक करा. तिथे वरील बाजूला क्लिक हिअर पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर UAN क्रमांक आणि इतर माहिती विचारली जाईल.
6 / 7
त्यानंतर हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म येईल. सर्व तपशील भरा आणि त्याला तुमची डॉक्युमेंट्स जोडा. आता तुम्हाला UAN, नाव, जन्मतारीख, आधार कार्ड, आधार लिंक केलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करावे लागेल
7 / 7
यादरम्यान एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. हायर पेन्शनचा लाभ फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच दिला जाईल, ज्यांचे EPS-95 सदस्य असताना EPFO ​​ने हायर पेन्शन पर्याय स्वीकारला नव्हता.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीPensionनिवृत्ती वेतनMONEYपैसाGovernmentसरकार