SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! बँकेत जाण्याची नाही गरज! फक्त एका फोनवर घरबसल्या झटपट होणार 'ही' कामं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 03:50 PM2021-05-23T15:50:57+5:302021-05-23T16:06:22+5:30

How To Start Doorstep Banking In SBI Bank : बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम करायचे असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही. फक्त एका फोनवर तुमचं काम आता झटपट घरबसल्या होऊ शकतं.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मध्ये खाते असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. बँकेतील व्यवहारासंबंधी कोणतेही काम करायचे असेल तर बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा ऑनलाईन लॉगिन करण्याची गरज नाही. फक्त एका फोनवर तुमचं काम आता झटपट घरबसल्या होऊ शकतं.

एका फोनच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी बँकेची कामं अगदी सहज करू शकता. याची खासियत म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकता. जर, तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पैसे पोहोचवेल करेल. याशिवाय पैसे जमा करायचे असतील तर बँक प्रतिनिधी पैसे जमा करण्याचं देखील काम करू शकतात.

एसबीआयच्या ग्राहकांना यामुळे आपली कामं लवकर करता येणार आहेत. बँकेने सुरू केलेली सुविधा नेमकी काय आहे?, याचा कसा फायदा घ्यायचा? तसेच या खास सर्व्हिसचा वापर कसा करायचा हे जाणून घेऊया.

आजकाल अनेक बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी डोअर स्टेप बँकिंग सुविधा सुरू केलेली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग बँक ग्राहकांना घरपोच बँक सेवा दिली जाते. यालाच डोअर स्टेप बँकिंग म्हणतात.

बँक रोख रक्कम ग्राहकांना देणे, ग्राहकांकडून रक्कम स्वीकारणे, चेक जमा करुन घेणे, चेकची मागणी, फार्म 15H स्वीकराणे, डीमांड ड्राफ्ट डिलीव्हरी, टर्म डिपॉजिट सल्ला या शिवाय इतर सेवा देखील ग्राहकांना पुरवल्या जातात. केवायसी कागदपत्रे देखील स्वीकारली जातात.

SBI ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग नागरिक आणि ज्यांचं वय 70 वर्षाहून अधिक आहे त्यांच्यासाठी डोअर स्टेप बँकिंग सुरु करण्यात आलं आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे ग्राहकांचा मोबाईल नंबर त्यांच्या खात्याशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे.

Doorstep banking च्या कस्टमर केअर अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रजिस्ट्रेशनसाठी 88.55 रुपये इतकं शुल्क प्रति व्यक्ति लागते. यानंतर बँक प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करेल.

बँकेची वेबसाईट, मोबाईल App आणि नेट बँकिगद्वारे तुम्ही डोअरस्टेप बँकिंग सुरू करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://bank.sbi/dsb या वेबपेजवर भेट देऊ शकता. याशिवाय तुमचं खातं असलेल्या शाखेत देखील फोन करु शकता.

18001037188 आणि 18001213721 वर कॉल करून देखील बँकेने दिलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक सतत आपल्या कामकाजामध्ये बदल करीत आहे.

बँकेचे लक्ष डिजिटल बँकिंगवर अधिक आहे. वेबसाईट आणि मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून बँकिंग सेवा वाढविण्यासाठीही जोरदार तयारी केली जात आहे. कोरोना कालावधीत ग्राहकांच्या सुविधा लक्षात घेता स्टेट बँकेने कित्येक महत्त्वाची पावले उचललीत.

स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना रोख किंवा एटीएमऐवजी अधिक डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचा सल्ला दिलाय. बँकेच्या वेबसाईटद्वारे आरटीजीएस, एनईएफटी, यूपीआय आणि रुपे कार्डाच्या वापरास प्रोत्साहन देत असल्याचं सांगितले जात आहे.

घाईघाईने बँकेचे काम निकाली काढावे लागणार्‍या ग्राहकांसाठी संपर्कहीन सेवा सुरू केलीय. यासाठी स्टेट बँकेने 1800 112 211 आणि 1800 425 3800 असे दोन टोल फ्री नंबर दिलेत. तुम्ही कोणत्याही क्रमांकावर कॉल करून बँकिंग सेवा मिळविण्याची विनंती करू शकता

या सेवेचा वापर करून ग्राहकांना बँक खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती आयव्हीआर आणि एसएमएसद्वारे मिळू शकेल. या क्रमांकावर कॉल करून आपण एटीएम कार्ड बंद करण्याची विनंती पुन्हा करू शकता.

बँकेने घरपोच सेवा सुरू केली आहे. रोख रक्कम जमा करणे किंवा रोख रक्कम काढणे, चेक क्लिअरन्स आणि बँक शाखांमध्ये सरकारी व्यवहार यांसारखी अत्यंत महत्त्वपूर्ण कामे बँकेतच केली जात आहेत. उर्वरित कामे शक्य तितक्या ऑनलाईन करण्यावर भर देण्यात आला आहे.

एटीएम किंवा ग्रीन पिन जारी करू शकता, नवीन एटीएम कार्ड देऊ शकता किंवा जुने कार्ड बंद करू शकता. ग्राहकांशी किमान संपर्क साधणे, कोरोना संसर्गाची जोखीम कमी करण्यासाठी बँकेचा प्रयत्न आहे, यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न केले जात आहेत.