Post Office च्या 'या' स्कीममध्ये पैसे गुंतवले तर होतील दुप्पट; पाहा कोणती आहे ही योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:34 PM2021-03-27T14:34:03+5:302021-03-27T14:40:01+5:30

Post Office Scheme : पाहा कोणती आहे ही स्कीम आणि काय आहेत फायदे

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. भारतातही परिस्थिती काही वेगळी नाही. गुंतवणूकदार अनेकदा पैशांची गुंतवणूक करताना विचार करत आहेत.

अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना एक सुरक्षित गुंतवणूक हवी आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

अशा प्रकारच्या गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिसची ही स्कीम गुंतवणूकदारांसाठी उत्तम ठरू शकते. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी या स्कीममध्ये गुंतवणूक करणं सुरक्षित मानलं जातं.

पोस्ट ऑफिसच्या अशा काही स्कीम आहेत. ज्यामध्ये रक्कम भरल्यास ती दुप्पटही होते.

अशाच प्रकारची स्कीम आहे ती म्हणजे किसान विकास पत्र स्कीम (Kisan Vikas Patra Scheme). या स्कीममध्ये कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

Kisan Vikas Patra Scheme ही भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेली वन टाईम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. ही स्कीम भारतातील सर्वा पोस्ट ऑफिस आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.

यामध्ये मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत मिळते. यामध्ये कमीतकमी १०० हजार रूपयांची गुंतवणूक करणं अनिवार्य आहे.

या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याच्या रकमेला कोणतीही कमाल मर्यादा नाही.

विशेषत: ही स्कीम शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून ते मोठ्या कालावधीसाठी आपले पैसे वाचवू शकतील.

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या स्कीमचा मॅच्युरिटी पिरअड १२४ महिने म्हणजेच १० वर्ष ४ महिने इतका आहे.

या स्कीममध्ये गुंतवल्यास १२४ महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होईल. दुसऱ्या तिमाहीपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत यावर ६.९ टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जर तुम्ही यामध्ये १ लाख रूपयांची गुंतवणूक करता तर मॅच्युरिटी पिरिअडपर्यंत ही रक्कम २ लाख रूपये होईल.

यामध्ये जमा रकमेवर जे व्याज देण्यात येतं त्याच आधारावर ही रक्कम दुप्पटही होत जाते.

जर तुम्हाला यावर कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यावर कमी व्याजदरात कर्जही उपलब्ध करून देण्यात येतं.

जर तुम्ही कोणत्याही आर्थिक अडचणीत असाल आणि तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर यावर कर्ज घेऊन तुम्ही आर्थिक अडचण दूरही करू शकता.