Investment Tips IPO : पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात येणार या कंपन्यांचे IPO; पैसे कमावण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:33 AM2023-07-31T09:33:43+5:302023-07-31T09:44:30+5:30

तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी कमाईची संधी घेऊन येणार आहे.

तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी कमाईची संधी घेऊन येणार आहे. गेल्या आठवड्यात अनेक कंपन्यांचे आयपीओ आले. तर काही कंपन्या नव्यानं शेअर बाजारात लिस्ट झाल्या. कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली आहे.

हा आठवडा आता पुन्हा तुमच्यासाठी कमाईची संधी घेऊन येणार आहे. कारण या आठवड्यात आणखी काही कंपन्यांचे आयपीओ बाजारात येण्यास तयार आहेत. जर तुम्ही यापूर्वीच्या आयपीओमध्ये गुंतवणूकीची संधी गमावली असेल किंवा तुम्हाला संधी मिळाली नसेल तर तुमच्यासाठी हा आठवडा उत्तम ठरू शकतो. पाहूया या आठवड्यात कोणत्या कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत.

एसबीएफसी फायनान्स आयपीओ - नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी एसबीएफसी (SBFC) फायनान्सचा आयपीओ (IPO) गुरुवार, 3 ऑगस्टपासून गुंतवणुकीसाठी खुला होईल. एसबीएफसी फायनान्सच्या आयपीओद्वारे 600 कोटी किंमतीचे नवीन इक्विटी शेअर जारी केले जाणार आहेत. एसबीएफसी फायनान्स आयपीओची एकूण ऑफर साईज 1,025 कोटी रुपये आहे.

इश्यूसाठी प्रति शेअर 54-57 रुपये प्राईज बँड निश्चित करण्यात आलाय. एसबीएफसी फायनान्स आयपीओसाठी अँकर गुंतवणूकदारांना 2 ऑगस्ट रोजी अलॉटमेंट केलं जाणार आहे. हा इश्यू 7 ऑगस्ट रोजी बंद होईल. एसबीएफसी फायनान्स हा मेनबोर्ड आयपीओ आहे आणि त्याचे शेअर्स बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट केले जातील.

कॉनकॉर्ड बायोटेक आयपीओ - बायोटेक फर्म कॉनकॉर्ड बायोटेकचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 4 ऑगस्ट रोजी खुला होणार आहे. या इश्यूद्वारे क्वाड्रिया कॅपिटलद्वारे संचालित खासगी फंड, हेलिक्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्स पीटीई लिमिटेड द्वारे केवळ 2.09 कोटी इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवले जातील. अँकर बुकसाठी इश्यू खुला होण्यापूर्वी एक दिवस आधी 3 ऑगस्ट रोजी लाँच केले जाईल. कंपनी 8 ऑगस्ट रोजी आपला इश्यू बंद करेल.

ओरियाना पॉवर आयपीओ - ओरियाना पॉवर स्मॉल अँड मीडियम एन्टरप्रायझेस आयपीओ आहे. हा आयपीओ मंगळवार 1 ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. कंपनीनं या आयपीओसाठी 115 ते 118 रुपये प्रति इक्विटी शेअर प्राईज बँड निश्चित केलाय. कंपनी आयपीओद्वारे सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी जमावण्याच्या तयारीत आहे. हा इश्यू 3 ऑगस्ट रोजी बंद होईल.

विन्सिस आयटी आयपीओ - विन्सिस आयटी आयपीओ एक एमएसएमई इश्यू आहे. हा आयपीओ 1 ऑगस्ट रोजी खुला होईल. आयपीओ पूर्णपणे 38.94 लाख इक्विटी शेअरसाठी एक फ्रेश इश्यू आहे. कंपनी आपल्या इश्यूसाठी 121-128 रुपयांचा प्राईज बँड निश्चित केलाय. गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये 1000 शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. हा इश्यू 4 ऑगस्ट रोजी बंद होईल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. )