शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio ने लॉन्च केली Space Fiber सेवा; आकाश अंबानी यांनी PM मोदींना दाखवला डेमो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 3:07 PM

1 / 7
Jio Narendra Modi-Akash Ambani: टेलिकॉम क्षेत्रात Jio सातत्याने नवनवीन तंत्रज्ञान आणत आहे. आता इंडियन मोबाईल काँग्रेस 2023 मध्ये जिओने आपल्या नवीन सेवेची घोषणा केली आहे. कंपनीने Jio Space Fiber लॉन्च केले आहे, जे देशातील दुर्गम भागांना इंटरनेटने जोडण्यात मदत करेल. हे सॅटेलाईट आधारित गिगा फायबर तंत्रज्ञान आहे, ज्याच्या मदतीने दुर्गम ठिकाणी इंटरनेट सेवा पुरवली जाऊ शकते.
2 / 7
अतिशय परवडणाऱ्या किमतीत ही सेवा देशभरात उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने सांगितले. विशेष म्हणजे, Jio आधीपासून Jio Fiber ब्रॉडबँड आणि Jio AirFiber सेवा देत आहे. दोघांचेही काम इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याचेच आहे. आता कंपनीने IMC 2023 मध्ये Jio Space Fiber सेवेची घोषणा केली आहे.
3 / 7
सध्या भारतातील चार ठिकाणे जिओ स्पेस फायबरने जोडली गेली आहेत. यामध्ये गुजरातचे गीर राष्ट्रीय उद्यान, छत्तीसगडचे कोरबा, ओरिसाचे नबरंगपूर आणि आसामचे ओएनजीसी-जोरहट यांचा समावेश आहे. जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर नंतर रिलायन्स जिओच्या कनेक्टिव्हिटी पोर्टफोलिओमधील हे तिसरे मोठे तंत्रज्ञान असणार आहे.
4 / 7
जिओ स्पेस फायबरच्या मदतीने ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी SIS कंपनीच्या उपग्रहांचा वापर केला जाईल. कंपनीच्या मते, जिओ स्पेस फायबर आता कुठेही आणि केव्हाही मल्टी-गीगाबिट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. ‘जिओ स्पेस फायबर’ दुर्गम भागात सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा देण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि प्रगत NGSO तंत्रज्ञानाचा वापर करेल.
5 / 7
आकाश अंबानी यांनी इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सेवेचा डेमोही दाखवला. ही सेवा इलॉन मस्क यांच्या स्टारलिंकसारखीच आहे, जी सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट पुरवते. यामुळे ब्रॉडबँड किंवा एअर फायबर उपलब्ध नसलेल्या भागातही इंटरनेट उपलब्ध होईल.
6 / 7
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​चेअरमन आकाश अंबानी यावेळी म्हणाले, 'जिओने भारतातील लाखो घरे आणि व्यवसायांना प्रथमच ब्रॉडबँड इंटरनेटचा अनुभव दिला. Jio Space Fiber सह आम्ही लाखो लोकांना इंटरनेटशी जोडण्याचा प्रयत्न करू. सरकारी सेवा, शिक्षण, आरोग्य आणि मनोरंजनापासून इतर अनेक सेवांना कनेक्ट करण्यात हे तंत्रज्ञान सक्षम असेल.
7 / 7
ही सेवा सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू होईल याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याची किंमत काय असेल, याबाबतही कंपनीने कोणतीही विशेष माहिती दिलेली नाही. परंतू, युजरला परवडणाऱ्या किमतीत इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सMukesh Ambaniमुकेश अंबानीAkash Ambaniआकाश अंबानीNarendra Modiनरेंद्र मोदी