तुमची पत्नी House Wife आहे का? तिच्या नावे 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक; दुप्पट नफा कमवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 09:08 IST2024-12-05T08:55:43+5:302024-12-05T09:08:01+5:30
House Wife Investment Tips : कमाईवर इन्कम टॅक्स कसा वाचवायचा, याबाबत बहुतांश लोक विचार करत असतात. सर्वसाधारणपणे टॅक्स बेनिफिट देणाऱ्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करून लोक इन्कम टॅक्स वाचवतात.

House Wife Investment Tips : कमाईवर इन्कम टॅक्स कसा वाचवायचा, याबाबत बहुतांश लोक विचार करत असतात. सर्वसाधारणपणे टॅक्स बेनिफिट देणाऱ्या सर्व योजनांमध्ये गुंतवणूक करून लोक इन्कम टॅक्स वाचवतात. पण काही गोष्टी अशाही असतात ज्या अनेकांना ठाऊक नसतात.
अशी एक व्यवस्था म्हणजे तुम्ही तुमची पत्नी जर गृहिणी असेल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. जर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करायला आवडत असेल तर तुमची पत्नी त्यात दुप्पट नफा कमावू शकते. त्यांच्या नावावर एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्ही व्याजाच्या माध्यमातूनही चांगली कमाई करू शकता आणि इन्कम टॅक्सही वाचवू शकता. समजून घेऊ कसं?
नियमाप्रमाणे एफडीवरील व्याजातून मिळणारं उत्पन्न वार्षिक ४० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर टीडीएस कापला जातो. जर तुमचं उत्पन्न कराच्या कक्षेत येत असेल, पण तुमची पत्नी गृहिणी असेल तर तुम्ही पत्नीच्या नावावर एफडी करून टीडीएस वाचवू शकता. प्रत्यक्षात गृहिणीकडून कर आकारला जात नाही.
दुसरीकडे, जर तुमची पत्नी लोअक टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असेल तर तुम्ही तिच्या नावावर एफडी घेऊन टीडीएस वजावट टाळू शकता. यासाठी तुमच्या पत्नीला फॉर्म १५ जी भरावा लागेल. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पत्नीच्या नावावर जॉइंट एफडीही करू शकता, पण यामध्ये तुम्हाला तुमच्या फर्स्ट होल्डर बनवावं लागतं.
जर एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल आणि वय ६० वर्षांपेक्षा कमी असेल तर टीडीएस कपात थांबविण्यासाठी त्यांना फॉर्म १५ जी भरावा लागेल. फॉर्म १५ जी हा आयकर कायदा, १९६१ च्या कलम १९७ ए अंतर्गत उपकलम १ आणि १ (ए) अंतर्गत येणारा एक डिक्लेरेशन फॉर्म आहे. याद्वारे बँकेला तुमच्या वार्षिक उत्पन्नाची माहिती मिळते. या फॉर्मच्या माध्यमातून जर तुमचं उत्पन्न कराच्या कक्षेत येत नसेल तर बँक एफडीवर टीडीएस कापत नाही.
फॉर्म १५ एच ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. तो जमा करून ज्येष्ठ नागरिक एफडीच्या व्याजावर कापला जाणारा टीडीएस थांबवू शकतात. परंतु ज्यांचं करपात्र उत्पन्न शून्य आहे, तेच हा फॉर्म सादर करू शकतात. ज्या बँक शाखांमधून पैसे जमा केले जात आहेत, त्या शाखांमध्ये हा फॉर्म जमा करावा लागणार आहे. कर्ज, अॅडव्हान्स, डिबेंचर, बॉन्ड्स आदी ठेवीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्त्रोतातून मिळणारं व्याजाचं उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास फॉर्म १५ एच भरावा लागतो.
पहिले व्याज देण्यापूर्वी १५ एच फॉर्म सादर करणं आवश्यक आहे. मात्र, ते बंधनकारक नाही. पण तसं केल्यास बँकेतून टीडीएस कपात सुरुवातीपासूनच थांबवता येऊ शकतो. जर एखादा ग्राहक हे फॉर्म भरण्यास चुकला तर इन्कम टॅक्स रिटर्न करताना मूल्यांकन वर्षात टीडीएसचा दावा केला जाऊ शकतो. अशावेळी तुम्हाला आयकर विभागाकडून परतावा मिळेल.