शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धमाका शेअर! ₹38 वर आला होता IPO, आता ₹1700 वर पोहोचला; केवळ दीड वर्षात दिला 4400% चा परताना!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 6:07 PM

1 / 8
शेअर बाजारातील सोलर पॅनल आणि मॉड्युल्स तयार करणारी कंपनी इन्सोलेशन एनर्जीच्या शेअरने केवळ दीड वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. इन्सोलेशन एनर्जीचा IPO सप्टेंबर 2022 मध्ये आला होता. तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत 38 रुपये एवढी होती.
2 / 8
कंपनीच्या शेअरने 15 एप्रिल 2024 रोजी 1700 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या दीड वर्षात इन्सोलेशन एनर्जीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 4400% पेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1750 रुपये एवढा होता.
3 / 8
38 रुपयांवरून 1700 रुपयांचा टप्पाही ओलांडला - आयपीओमध्ये इन्सोलेशन एनर्जीच्या शेअरची किंमत 38 रुपये होती. 10 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीचा शेअर 76.10 रुपयांवर सूचीबद्ध झाला होता. इन्सोलेशन एनर्जीचा शेअर लिस्टिंगच्या दिवशी 79.90 रुपयांवर पोहोचला होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी दिसून आली आहे.
4 / 8
कंपनीचा शेअर 15 एप्रिल 2024 रोजी 1743.85 रुपयांवर पोहोचला आहे. अर्थात या शेअरने 38 रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत 4400% हून अधिकचा परतावा दिला आहे. महत्वाचे म्हणजे, या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक 118.50 रुपये एवढा आहे.
5 / 8
एका वर्षात 1070% चा परतावा - गेल्या एका वर्षाचा विचार करता, इन्सोलेशन एनर्जीच्या शेअरमध्ये 1070% वाढ झाली आहे. 17 एप्रिल 2023 रोजी कंपनीचा शेअर 149 रुपयांवर होते. तो 15 एप्रिल 2024 रोजी 1743.85 रुपयांवर पोहोचला.
6 / 8
गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 295% वाढ झाली आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी इन्सोलेशन एनर्जीचा शेअर 445.10 रुपयांवर होता, तो आता 1743.85 रुपयांवर पोहोचला आहे. या वर्षात आतापर्यंत, इन्सोलेशन एनर्जी शेअर्समध्ये 125% ची जबरदस्त तेजी दिसून आली आहे.
7 / 8
कंपनीचा IPO एकूण 192.79 पट सबस्क्राइब झाला आहे. तर कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा 235.55 पट सबस्क्राइब झाला आहे.
8 / 8
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकMONEYपैसा