रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1000 हून अधिक ट्रेनमध्ये 'ही' सुविधा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 19:01 IST2022-05-17T18:54:38+5:302022-05-17T19:01:36+5:30
Indian Railways Facilities: मार्च 2022 पासून रेल्वेने बेड रोलची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.

नवी दिल्ली : तुमचाही ट्रेनने प्रवास करण्याचा प्लॅन असेल किंवा तुम्ही बुकिंग केले असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेने 1018 ट्रेनमध्ये विशेष सुविधा देण्याचे जाहीर केले आहे.
कोरोनाच्या काळात रेल्वेने अनेक सुविधा बंद केल्या होत्या, मात्र आता पुन्हा जुन्याच सुविधा पुन्हा देण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च 2022 पासून रेल्वेने बेडरोलची सुविधा पुन्हा सुरू केली आहे.
दरम्यान, आयआरसीटीसीने (IRCTC) सांगितले की, रेल्वेकडून 1018 ट्रेनमध्ये पुन्हा बेड रोल देण्याची सुविधा जाहीर केली आहे. एसी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ब्लँकेट, चादरी, उशा आणि छोटे टॉवेल दिले जातात. आता ही सुविधा पुन्हा सुरू केली जात आहे.
तुम्हीही एसी ट्रेनचे तिकिट आरक्षित केले असेल, तर तुमच्या ट्रेनमध्ये ब्लँकेट-चादर मिळेल की नाही, ते तपासा... तुम्ही या ट्रेनची लिस्ट आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता.
भारतीय रेल्वेने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. आयआरसीटीसीने ही लिस्ट जारी केली असून याबाबत सांगण्यात आले आहे.
दरम्यान, तुम्ही सुरुवातीला आयआरसीटीसी वेबसाइटवर जाऊन चेक केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला irctc.co.in वर लॉग इन करावे लागेल आणि कंटेंटवर क्लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला संपूर्ण लिस्ट मिळेल.