शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Railway : रेल्वेने विकसित केला एसी-३ इकॉनॉमिक कोच खास, माफक तिकिटात सुविधा मिळणार हाय क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 10:18 PM

1 / 7
हाय क्लास सुविधा मिळणाऱ्या रेल्वेच्या एसी डब्यांमधून प्रवास करणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र एसी डब्यांच्या महाग तिकिटांमुळे सर्वसामान्यांना एसीमधून प्रवास करणे शक्य होत नाही. मात्र आता एसी कोचमधून प्रवास करणे सर्वसामान्यांचा अवाक्यात येण्याची शक्यता आहे.
2 / 7
रेल्वेच्या कपुरथला येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासचा नवा कोच विकसित करण्यात आला आहे. या कोचची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, लवकरच हा कोच जनतेच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.
3 / 7
एसी थ्री टियर इकॉनॉमी क्लासच्या या कोचमुळे एसी थ्री टियर आणि स्लिपर कोचच्या मधील पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये स्वस्त दरामध्ये प्रवाशांना आरामदायी आणि एसी ३ टियर कोचचा प्रवास करता येणार आहे. या कोचमध्ये ८३ बर्थ असणार आहेत.
4 / 7
पश्चिम आमि मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राहुल जयपुरियार यांनी सांगितले की, हल्लीच या कोचचे यशस्वी परीक्षण कोटा आणि नागदाच्या दरम्यान करण्यात आले आहे. हा कोच रेल्वेच्या रुळांवरून १८० किमी प्रतितास वेगाने चालवण्यात आला.
5 / 7
या कोचमध्ये बसण्यासाठी ८३ जागा असतील. तर दिव्यांगांसाठी दिव्यांग फ्रेंडली प्रवेश आणि एक्झिट गेट असतील. तसेच या कोचमधील टॉयलेटसुद्धा दिव्यांग फ्रेंडली असेल.
6 / 7
या कोचमध्ये वाढवण्यात आलेली सुविधा म्हणजे मिडल बर्थच्या हेड रूमबाबतची आहे. आता आधीच्या पेक्षा तो वाढवण्यात आला आहे. आता हा कोच लवकरच रेल्वेच्या सेवेत दाखल होऊन रुळावरून धावताना दिसणार आहे.
7 / 7
या नव्या कोचमध्ये एसीच्यादरम्यान, सेपरेट डक्ट उपलब्ध असतील. प्रत्येक सीटवर प्रवासी याचा वापर करू शकतील. याच्या सीट मॉडलर आहेत. तसेच प्रत्येक सीटवर प्रत्येक प्रवाशाला एक रिडींग लँम्पसुद्धा मिळणार आहे.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेbusinessव्यवसायIndiaभारत