शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय अर्थव्यवस्था घौडदौड करणार, पुढील आर्थिक वर्षात विकासदर ११.५ टक्के राहणार; IMF चा अंदाज

By बाळकृष्ण परब | Published: January 26, 2021 11:11 PM

1 / 5
आधीच मंदी त्यात आलेलं कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण असतानाच भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या ताज्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकमध्ये याची नोंद करण्यात आली आहे.
2 / 5
आयएमएफने २०२१ या आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेत सर्वात वेगवान म्हणजे ११.५ टक्क्यांच्या वेगाने वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. अशा प्रकारे भारत २०२१ मध्ये सर्वाधिक वेगाने वाढ होणारा देश बनू शकतो.
3 / 5
यापूर्वी आयएमएफने आपल्या ऑक्टोबर महिन्यात जारी केलेल्या रिपोर्टमध्ये वित्तवर्ष २०२१साठी भारतीय अर्थव्यवस्थेत ८.८ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता.
4 / 5
तर आयएमएफने २०२० या आर्थिक वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ उणे ८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यापूर्वी आयएमएफने २०२० या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ ही ६.८ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली होती.
5 / 5
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, त्यांनी २०२१ या वर्षासाठी जागतिक अर्थव्यवस्थेतीत वाढ ही ५.५ टक्के एवढी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. मात्र ही वाढ कोरोना विषाणू आणि लसीवर अधिक अवलंबून असेल.
टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय