शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

India China FaceOff: चीनचा भारतीय बाजारपेठेवर कब्जा! अनेक स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कसं करणार बॉयकॉट?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:28 PM

1 / 10
चीनच्या सीमेवर प्रचंड ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि चीनसोबत व्यापार थांबण्यासाठी आंदोलन तीव्र झाले आहेत. पण कटु सत्य हे आहे की, चीन हा आपल्या देशातील पहिल्या १० व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्याने अनेक क्षेत्रांमध्ये घुसखोरी केली आहे. स्मार्टफोनच्या ६५ टक्के बाजारावर चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. एवढेच नव्हे तर चिनी कंपन्यांनी भारतातील अनेक मोठ्या आणि लोकप्रिय स्टार्टअपमध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
2 / 10
भारत-चीन सीमेवर हिंसक संघर्ष घडला असून त्यानंतर पुन्हा एकदा बहिष्कार चीनच्या चळवळीला देशात वेग आला असल्याचे दिसते. चीनने आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक्स, ई-कॉमर्स, हॉस्पिटॅलिटी आणि ई-लर्निंग यासारख्या क्षेत्रात खोलवर रुजला आहे. मग बॉयकोट चीन आंदोलन यशस्वी होऊ शकेल का? आपण चिनी वस्तूशिवाय जगू शकतो? वास्तविक परिस्थिती काय आहे ते पाहूया.
3 / 10
आपल्या एकूण परराष्ट्र व्यापारात चीनचा हिस्सा दहा टक्क्यांहून अधिक आहे, त्यामुळे अचानक हा व्यवसाय थांबवणे भारताला शक्य नाही. भारताच्या एकूण परराष्ट्र व्यापारात चीनचा वाटा १०.१ टक्क्यांपर्यंत आहे, तर चीनच्या विदेश व्यापारात भारताचा वाटा फक्त २.१ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण निर्यातीत चीनचा वाटा फक्त ५.३ टक्के आहे, तर एकूण आयातीमध्ये चीनचा वाटा १४ टक्के आहे. एवढेच नव्हे तर चीनच्या एकूण आयातीमध्ये भारताचा वाटा फक्त ०.९ टक्के आहे.
4 / 10
चीन आणि हाँगकाँग यांचे एकत्रिकरण केलं तर ते भारतातील सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. यानंतर अमेरिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. सन २०१८-१९ मध्ये चीन-हाँगकाँगमधून भारताचा एकूण व्यापार १०३.५३ अब्ज डॉलर्स (सुमारे ७ लाख ८८,७५९ कोटी रुपये) होता. या कालावधीत, अमेरिकेसह भारताचा व्यापार ८२.९७ अब्ज डॉलर्स (सुमारे ६ लाख, ३२,१२० कोटी रुपये) होता.
5 / 10
चीन, अमेरिकेसह युएई, सौदी अरेबिया, इराक, सिंगापूर, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि इंडोनेशिया शिया या देशांचा १० मोठ्या व्यापार भागीदारांमध्ये समावेश आहे. भारताच्या एकूण परराष्ट्र व्यापारात या देशांचा ५० टक्के जास्त हिस्सा आहे. अलीकडेच चीन आणि हाँगकाँग यांच्या व्यापारात काही दिलासा मिळाला आहे. भारताने अलीकडे चीनसोबत व्यापार कमी करुन इतर देशांशी व्यापार वाढवला आहे.
6 / 10
पण चीनबरोबरच्या व्यापारात मोठी चिंता आहे की भारताची व्यापारात तूट होईल. भारताच्या एकूण परकीय व्यापार तूटीच चीनचा वाटा २००७-०८ मध्ये १८.०७ टक्क्यांवरून २०१६-१७ मध्ये ४७.०१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तथापि, २०१९-२० मध्ये ते किंचित खाली ३०.०३ टक्क्यांवर आला आहे. जेव्हा आपला आयात व्यापार कोणत्याही देशातील आपल्या निर्यातीपेक्षा जास्त असतो, तेव्हा तो जितका जास्त तितका व्यापारी तूट जास्त मानली जाते.
7 / 10
चीनमधून भारतात आयात होणार्‍या मुख्य वस्तूंमध्ये इलेक्ट्रिक मशीनरी आणि उपकरणे, अणुभट्ट्या, बॉयलर मशीनरी, यांत्रिक उपकरणे, सेंद्रिय रसायने आणि औषधे, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स आणि खते यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारत चीनला सेंद्रिय रसायने, स्लग्स आणि ऐश, खनिज इंधन, खनिज तेल, मासे आणि सागरी उत्पादने, इलेक्ट्रिक मशिनरी आणि उपकरणे निर्यात करतो.
8 / 10
चीनच्या कंपन्यांनी भारताचा मोबाईल बाजार व्यापला आहे. भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेतील ६५ टक्क्यांहून अधिक चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. २०१९ मध्ये चिनी कंपनी झिओमीचा बाजारातील हिस्सा २८.६ टक्के, विवोचा १५.६ टक्के, ओप्पोचा १०.७ टक्के आणि रियल मीचा १०.६ टक्के आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट टीव्ही बाजाराच्या सुमारे ३५ टक्के चीनी कंपन्यांचे नियंत्रण आहे.
9 / 10
चिनी कंपन्यांनी भारतातील अनेक प्रमुख स्टार्टअपमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. चिनी कंपन्यांनी पेटीएममध्ये ३.५३ अब्ज डॉलर्स (सुमारे २६,८९४ कोटी रुपये), ओलामध्ये ३.२८ अब्ज डॉलर्स (सुमारे २५,००० कोटी), ओयो रूम्समध्ये ३.२ अब्ज डॉलर्स (सुमारे २४,३८० कोटी रुपये), स्नॅपडीलमध्ये १.८ अब्ज डॉलर्स (सुमारे १३,७१४ कोटी रुपये) बाईजूमध्ये १.४७ अब्ज डॉलर्स (सुमारे ११,१९९ कोटी) ची गुंतवणूक केली आहे.
10 / 10
चीनमधील एफडीआय फारच कमी आहे. गेल्या दोन दशकांत केवळ २.४ अब्ज डॉलर्स (सुमारे १८,२८५ कोटी रुपये) ची विदेशी गुंतवणूक चीनमधून झाली, जी देशात येणाऱ्या थेट विदेशी गुंतवणूकीच्या निम्म्या टक्के आहे. चीनमधून येणारी बहुतेक एफडीआय सिंगापूर आणि हाँगकाँगमधून येते असं तज्ज्ञ सांगतात.
टॅग्स :IndiaभारतchinaचीनMarketबाजारMobileमोबाइल