ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 21:12 IST2025-08-30T19:56:22+5:302025-08-30T21:12:05+5:30

'आतापर्यंत ३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल झाले आहेत. कृपया १५.०९.२५ पूर्वी ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी तुमचा आयटीआर दाखल करा आणि ई-पडताळणी करा' असा एसएमएस आयकर विभागाकडून पाठवण्यात येत आहे.

आयकर विभागाने यावर्षीचे फाइल करण्यासाठी मेसेज पाठवण्यास सुरुवात केली आहे. आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. आता फक्त तीन आठवडे उरले आहेत.

आयकर विभागाने या संदर्भात एसएमएस पाठवण्यास सुरुवात केली आहे. 'आतापर्यंत ३ कोटींहून अधिक आयटीआर दाखल केले गेले आहेत! कृपया १५.०९.२५ पूर्वी ई-फायलिंग पोर्टलवर मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी तुमचा आयटीआर दाखल करा आणि ई-व्हेरिफाय करा',असं या एसएमएसमध्ये म्हटले आहे.

सगळ्यांच एसएसएस येत असल्यामुळे आयटीआर कुणी भरावा असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. ज्या लोकांचे वार्षिक वेतन ३ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांनीही रिटर्न भरणे आवश्यक आहे का?

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची उत्पन्न मर्यादा करदात्याच्या एकूण उत्पन्नावर आणि निवडलेल्या कर प्रणालीवर म्हणजेच जुनी किंवा नवीन कर प्रणालीवर आधारित आहे.

जर करदात्याचे एकूण उत्पन्न मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर करदात्याने आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. नवीन कर प्रणालीसाठी मूलभूत सूट मर्यादा ३ लाख रुपये आहे आणि जुन्या कर प्रणालीसाठी ती २.५ लाख रुपये आहे.

आयटीआर फॉर्म वन आणि आयटीआर फॉर्म फोर हे सरलीकृत फॉर्म आहेत जे मोठ्या संख्येने लहान आणि मध्यम करदात्यांच्या गरजा पूर्ण करतात.

सहज हे फॉर्म ५० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न आणि पगार, एक घर मालमत्ता, इतर स्रोत आणि वार्षिक ५,००० रुपयांपर्यंत कृषी उत्पन्न असलेल्या व्यक्ती दाखल करू शकतात.

सुगम हे व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंबे आणि ज्या कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे.

व्यवसाय आणि व्यावसायिक उत्पन्न आहे अशा कंपन्यांद्वारे दाखल केले जाऊ शकते. ITR-2 हे अशा व्यक्ती आणि HUFs द्वारे दाखल केले जाते ज्यांचे उत्पन्न व्यवसाय किंवा व्यावसायिक नफा किंवा नफ्यातून नाही.