१ एप्रिलपासून बदलणार 'या' बँकांचे IFSC कोड, चेक करा तुमचे अकाऊंट डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:10 IST2021-03-30T16:04:45+5:302021-03-30T16:10:33+5:30
ग्राहकांना आता करावा लागेल नव्या IFSC कोडचा वापर

१ एप्रिल पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनाटडेट बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बंकेचे आयएफएससी कोड बदलणार आहेत.
आता १ एप्रिलपासून या बँकांच्या ग्राहकांना नव्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागणार आहे.
ऑगस्ट २०१९ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांच्या विलिनिकरणाचा निर्णय घेतला होता.
आता या बँकांचे आयएफएससी आणि एमआयसीआर कोड बदलण्यात येणार आहेत.
ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचं आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनिकरण पंजाब नॅशनल बँकेत झालंय.
तर सिंडिकेट बँकेचं विलिनिकरण कॅनरा बँकेत, आँध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनिकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणार आहे.
पंजाब नॅशनल बँक - ओरिएंटल बँक / युनायटेड बँक ऑफ इंडिया : १ एप्रिल २०२१
युनियन बँक ऑफ इंडिया - आंध्रा बँक / कॉर्पोरेशन बँक : १ एप्रिल २०२१
इंडियन बँक - अलाहाबाद बँक : १ मे २०२१
कॅनरा बँक - सिंडिकेट बँक : १ जुलै २०२१